पूर्वा: हेलो पप्पा.. कसे आहात.. पापा: मी ठीक आहे पूर्वा, तू कशी आहेस, काय करत आहेस.. पूर्वा: मी आता जेवायला बसणार होते.. बघा ना पप्पा अखिल अजुन नाही आला.. काल पण नव्हता घरी.. पापा (चिंतेत): तू इथे आपल्या घरी राहायला का नाही येत.. नेहमीसाठी.. अजुन किती दिवस तुला त्या घरात राहायचं आहे.. काही नाही उरलं तुझा त्या घरामध्ये.. ऐकून घे माझं. पूर्वा: पप्पा याबद्दल मी तुम्हाला किती वेळा सांगितला आहे, कुठे नाही जायचं मला.. हे घर माझं आहे.. हे घर सोडून मी कुठे नाही जाणार.. पण पूर्वाने त्यांचा काही एक ऐकलं नाही. पूर्वाला आजपण असं वाटत होतं की, अखिल पुन्हा तिच्यावर पहिल्यासारखं प्रेम करेल आणि तिच्याबरोबर आपला वेळ खर्च करेल. पूर्वा आजपण अखिलसाठी त्याच्या आवडीचा जेवण बनवुन ठेवते, पण अखिलला या गोष्टीची जरासुद्धा चिंता नव्हती. एकवेळा पूर्वा रात्री उशिरापर्यंत अखिलची वाट बगत होती, पूर्वाने त्यारात्री काही खाल्लं नव्हतं. पूर्वाचे डोळे झोपेने बंद होणार होते, तितक्यात ती दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकते, अखिलला बगायला ती दरवज्याजवळ येते. अखिल पूर्वा कडे बघतो, चेहर्यावर थोडा हास्य दाखवतो आणि पूर्वाशी जराही न बोलता आपल्या बेडरूम कडे वळतो. पूर्वा त्याच्या मागे मागे बेडरूम मध्ये जाते. पूर्वा आपल्यावर रागावलेली आहे हे बघून अखिल तिची समजूत काढण्यासाठी तिच्या जवळ जातो. अखिल: तू जेवलीस का?? मी बाहेरून जेऊण आलो आहे.. मी आता झोपायला जात आहे.. उद्या सकाळी लवकर उठून ऑफीस ला जायचं आहे.. उद्या सुद्धा मे उशिरा येईल.. पूर्वा(ओरडून): असं कधीपर्यंत चालेल.. मी रोज तुमच्या आवडीचा जेवण बनवते. आणि तुम्ही रोज बाहेरून जेऊण येता.. आणि तुमच्या फोनला काय झाला आहे.. नेहमी बंद राहतो.. अखिल(पूर्वा च्या जवळ जाउन): असं काही नाही पूर्वा.. ऑफीसमधे सद्ध्या खूप कामं असतात.. दिवसभर काम करून मी थकून जातो. पूर्वा: म्हणून काय तुम्ही पूर्ण दिवसात एक फोन देखील करू शकत नाही.. मला तर तुमच्यावर शंका येत आहे.. तुम्ही ऑफीसनंतर कुठे तरी जाता, कोणाकडे.. अखिल(पूर्वा वर ओरडून): मुर्खा सारखं काहीही बोलू नको..माझा कसला चक्कर नाही चालू.. आणि हे तुलापण चांगल्या प्रकारे माहीत आहे.. मला मान्य आहे, मी आजकाल तुला जास्त वेळ देऊ शकत नाही आहे.. याचा अर्थ हे नाही की तू काहीपण विचार कर माझ्याबद्दल .. (अखिल थोडा वेळ थांबतो). मी ऑफीस नंतर एका ठिकाणी जातो..जिकडे मला खूप आनंद भेटतो.. तिकडे खूप लोकं येतात, वृद्ध, तरुण लहान मुले.. त्यांच्याकडे बघतो तेव्हा मला माझ्या अडचणी खूप छोट्या दिसतात.. पूर्वा: तर मला त्या ठिकाणी का घेऊन जात नाही. या निमित्ताने काही वेळ एकत्र घालवता येईल.. अखिल: ते तुझ्यासाठी नाही आहे.. मी तुला तिकडे घेऊन नाही जाउ शकत.. मला स्वताला तुझं तिकडे येणं आवडणार नाही.. पूर्वा: ते मला काही माहीत नाही.. ज्या ठिकाणाची तुम्ही गोष्ट करत आहात.. तिकडे मला यायचं आहे. उद्या मी तुमच्या ऑफीस मध्ये येईल, संध्याकाळी.. आपण दोघं एकत्र जाऊया.. अखिल(अखिल बेडरूम मधून बाहेर पडतो.. पूर्वा त्याच्या मागे मागे चालते): मुर्ख नको बनू.. एक वेळा सांगितला ना तू तिकडे नाही येऊ शकत.. तुला किती वेळा सांगितला आहे.. पप्पाच्या घरी काही दिवसासाठी निघून जा.. तिकडे तुझं मन लागेल.. आणि तसं पण तुझे वडील बरोबर बोलत आहेत.. इथे तुझ्यासाठी काही उरलं नाही..(अखिल घराच्या बाहेर पडतो..) पूर्वा: एवढ्या रात्री कुठे चालले तुम्ही? अखिल: जिथे मला असायला हवं.. तुझ्यापासून खुप दूर.. तू आता माझी वाट बगायचं सोडून दे.. मी आता परत कधीच नाही येणार.. पूर्वा: नाही.. तुम्ही असं नाही करू शकत.. पूर्वाचं अखिल कडे एवढच मागणं होतं की, अखिलने तिच्यावर पहिल्यासारखं प्रेम करावं, तिला आपला वेळ द्यावं. अखिल त्यारात्री न खाता घराबाहेर निघून जातो. पूर्वा रात्रभर अखिलबरोबर झालेल्या भांडनामुळे रडत राहते आणि आपल्या जुन्या सुखद आठवणींना आठवून आपल्या आजच्या परिस्थितीचा तिरस्कार करते. अखिल रात्री घरी परत आला असेल या आशेने दुसर्या दिवशी सकाळी पूर्वा अखिलला आपल्या घरामध्ये शोधते. अखिल तिला घरामध्ये कुठेही भेटत नाही. पूर्वा अखीलच्या मोबाइलवर फोन लावते, पण नेहमीसारखा मोबाइल बंद असल्या कारणामुळे फोन लागत नाही. पूर्वा अखिलला शोधायला त्याच्या ऑफीस मध्ये जाते. ऑफीसच्या सेक्यूरिटीचे लोकं तिला ऑफीस मध्ये घुसु देत नाही. सेक्यूरिटी: कोणाला भेटायचं आहे मॅडम?? पूर्वा: अखिल भारद्वाज.. कुठे आहे त्यांचा ऑफीस.. मी त्यांची वाइफ आहे..त्यांना भेटायचं आहे.. सेक्यूरिटी: मॅडम मला दोन मिनिटे द्या, मी चेक करून सांगतो.. (कंप्यूटर वर रेकॉर्ड्स बघून) सॉरी मॅडम.. अखिल भारद्वाज नावाचा कोणी इकडे काम करत नाही.. पूर्वा: तुम्ही नीट चेक केलं ना.. अखिल इकडे मागच्या चार वर्षापासून काम करत आहेत.. सेक्यूरिटी: एक मिनिट मॅडम.. मी परत चेक करून सांगतो.. भेटलं.. अखिल भारद्वाज.. पण सर आता ह्या कंपनीमध्ये काम नाही करत, सरांच्या नावाची एंट्री सहा महिने पहिलेची आहे, त्यानंतर सर इकडे कधी आले नाही. सॉरी मॅडम.. यापेक्षा जास्त मदत नाही करू शकत.. पूर्वा नाराज होऊन आपल्या घरी परत जाते आणि रोजच्या सारखं अखिलची घरी वाट बघते. त्यारात्री पुन्हा दरवाज्याच्या आवाजाने पूर्वा बेडरूम मधून बाहेर अखिलला बगायला येते. अखिलच्या हातात चाकू बघून घाबरून जाते. अखिल पूर्वाला मारण्यासाठी तिच्याकडे पळत येतो. दोघांमध्ये चांगलाच युद्धा जमतं. अखिल पूर्वावर मात करून आपल्या चाकू ने पूर्वाच्या पोटामध्ये वार करतो. पूर्वा जखमी अवस्थेत जमिनीवर पडते. घराच्या भिंतीवर लटकलेल्या एका फोटो कडे बघून जखमी अवस्थेत हसायला लागते. पूर्वाचे प्राण जात होते पण ती सुखी दिसत होती. भिंतीवर अखिलच्या फोटोवर लटकलेला हार पाहून पूर्वा आपल्या आत्महत्येचा स्वीकार करते. रोहन पवार भ्रमणध्वनी:- ७२०८७१२९९१]]>