चेहर्यावर तेज आहे. देहामध्ये शक्ती आहे. मनामध्ये उत्साह आहे. बुद्धीमध्ये विवेक आहे. हृदयामध्ये करून आहे. मातृभूमीवर प्रेम आहे. इंद्रियांवर संयम आहे. मन ज्याचे स्थिर आहे. आत्मविश्वास दृढ आहे. इच्छाशक्ती प्रबळ आहे. धाडसाचे बळ आहे. सिंहासारखा निर्भय आहे. ध्येय ज्याचे उच्च आहे. सत्य ज्याचा ईश्वर आहे. व्यसनापासून मुक्त आहे. जीवनामध्ये शिस्त आहे. प्रेमळ ज्याचा सूर आहे. मानवता हेच कुळ आहे. गुरुजनांचा आदर आहे. पालाकांवरती श्रद्धा आहे. दिन-दुबळ्यांचा मित्र आहे. सेवेसाठी तत्पर आहे. देवावरती भक्ती आहे. जीवनामध्ये नीती आहे. चारित्र्य ज्याचे शुध्द आहे. तोच आदर्श युवक आहे. (संकलन:- योगेश खराडे, स्वा. सावरकर व्हाट्सअप समुह)]]>