विविध राज्यांतील जागरूक आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून मशिदींवरील भोंग्यांमुळे होणार्या उपद्रवासंबंधी हिंदु विधीज्ञ परिषदेकडे तक्रारी येत आहेत. कित्येक नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी संपर्क केला आहे. वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यापेक्षा एकाच याचिकेत विविध शहर आणि गावांमधील तपशील न्यायालयापुढे सादर करता येतो; मात्र त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांकडे आणि पोलिसांकडे निवेदन देणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना मशिदींवरील भोग्यांचा उपद्रव होतो, त्यांच्यासाठी अशा तक्रारीचा मसुदा येथे देत आहोत. नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अशा पत्राची पोच घ्यावी आणि स्वत:जवळ जपून ठेवावी. पोच मिळालेल्या पत्राची प्रत टपालाने (पोस्टाने) अथवा इ-मेलने हिंदु विधीज्ञ परिषदेला पुढील पत्त्यावर पाठवावी. १. मुंबई अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद ३०५, बिर्या हाऊस, २६५, पेरिन नरिमन स्ट्रीट, बाजारगेट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ भ्रमणभाष क्र. : ८४५१००६०५५
२.गोवा अधिवक्ता नागेश ताकभाते द्वारा : श्री. नारायण नाडकर्णी, कृष्णप्रभा हाऊसिंग सोसायटी, तळमजला, खडपाबांध, फोंडा, गोवा ४०३४०१. भ्रमणभाष क्र. : ८४५१००६०५८
प्रति, १. —– पोलीस ठाणे २. जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी, —— जिल्हा विषय : मशिदीवरील भोंग्यामुळे/ध्वनीवर्धकामुळे होणारा उपद्रव महोदय, पर्यावरण संरक्षण कायद्याचे कलम १५, तसेच ध्वनीप्रदूषण नियम २००० च्या नियम क्रमांक ७ प्रमाणे ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीस ५ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यासाठी खटला दाखल करावयाचा असल्यास जिल्हादंडाधिकार्यांकडून कृती केली जाणे अपेक्षित आहे. जेव्हा मशिदीवरील ध्वनीवर्धक अथवा भोंग्याची तक्रार नागरिक करतात, त्या वेळी कडक शिक्षा असणार्या वरील कलमांखाली पोलिसांना गुन्हा नोंदवता येत नाही. भारतीय दंड संहितेच्या १८८ कलमाखाली अथवा पोलीस अधिनियमाखाली नोंदवलेल्या गुन्ह्यात पुरेशी कडक शिक्षा नसल्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा असा उपद्रव चालूच रहातो. पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे जीवन नरकप्राय बनू नये अन् या दोघांनी एकमेकांशी समन्वय साधून अशा ध्वनीप्रदूषणाचा बंदोबस्त कायमचा करावा, या दृष्टीने आपणा दोघांनाही हे पत्र पाठवत आहे. —— भागात / पत्त्यावर (पूर्ण पत्ता द्यावा) एक मशीद आहे. ही मशीद अधिकृत आहे कि अनधिकृत आहे, याची मला माहिती नाही. दिवसातून — वेळा (येथे पूर्ण तपशील वेळेनुसार देता येईल.) या मशिदीतून कर्कश आणि प्रचंड मोठ्या आवाजात बांग दिली जाते. कित्येक शेकडो मीटरपर्यंत ती ऐकू येते. नागरिकांना त्याचा उपद्रव होतो. वृद्ध माणसे, आजारी व्यक्ती, विद्यार्थी, तसेच पहाटेच्या वेळी झोप पूर्ण न झालेले श्रमजीवी, अशा सर्वांनाच या कायदेभंगाची कमालीची चीड आहे. ज्या व्यक्तींकडून असे ध्वनीप्रदूषण केले जाते, त्यांच्या विरोधात फौजदारी खटला भरून ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपये दंड ही शिक्षा त्यांना देण्यासाठी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे मी / आम्ही करत आहे/आहोत. पोलिसांनी हे पत्र मिळताच मशिदीस भेट द्यावी, आसपास फिरून नागरिकांचे जबाब नोंदवून घ्यावेत, तसेच जेव्हा बांग होईल, तेव्हा ध्वनीची पातळी मोजून पंचनामा करावा. मशिदीमधून ध्वनीप्रदूषण करण्यास कोण उत्तरदायी आहे, याचीही सखोल चौकशी करावी आणि त्याचा अहवाल जिल्हादंडाधिकार्यांना पाठवावा, अशी मी या पत्राद्वारे मागणी करत आहे. जिल्हादंडाधिकार्यांनी माझे हे पत्र दप्तरी दाखल न करता, पोलिसांकडे पाठपुरावा करत रहावा आणि त्यांचा अहवाल मागवून दंडात्मक कारवाई करावी, अशी माझी/आमची अपेक्षा आहे. माझ्या/आमच्या पत्रास लवकरात लवकर उत्तर द्यावे आणि ध्वनीवर्धक अन् भोंग्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी न्यायालयाकडे हे प्रकरण नेण्याची वेळ माझ्यावर/आमच्यावर आणू नये, अशी मी/आम्ही आपणा दोघांनाही विनंती करत आहे/आहोत. आपला,(तक्रारदाराचे नाव आणि पत्ता)
]]>