कोहली, पांड्याने केले काम फत्ते, ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-२० मालिका बरोबरीत

कृणाल पांड्याच्या ४ विकेट्स व कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी व दोन चेंडू राखत विजय मिळवला. सिडनी: पहिल्या सामन्यातील निसटता पराभव, दुसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय. यामुळे उरलेल्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्यावाचून भारताकडे पर्याय नव्हता. कोहलीने स्वतःवर जबाबदारी घेत कृणाल पांड्याच्या सुरेख गोलंदाजीनंतर भारताला विजय संपादन करून दिला आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या दौऱ्यात पहिला विजय नोंदवत मालिका बरोबरी राखण्यात यश मिळवलं. ऑस्ट्रेलियाच्या १६५ धावांचं लक्ष्य पार करण्यास उतरलेल्या रोहित शर्मा – शिखर धवन या जोडीने आक्रमक सुरुवात केली. २८ चेंडूंतच संघाचं अर्धशतक झळकावत हि जोडीच धावसंख्या पार करेल कि काय असे दिसू लागले. पण पावरप्लेच्या शेवटच्या षटकात ऍडम झम्पाच्या गोलंदाजीवर स्केवर लेगला चेंडूं करण्याच्या नादात रोहित (२३ धावा, १६ चेंडू) बाद झाला. पुढच्याच षटकात शिखर धवनही (४१ धावा, २२ चेंडू) बाद झाला आणि भारताची अवस्था दोन बाद ६७ अशी झाली. मग कर्णधार कोहलीने आपली कप्तानी बारी पेश करीत टी-२० मधले १९वे अर्धशतक झळकावले आणि भारताला धावांचा पल्ला सहा गाडी राखत विजयश्री केले. कोहलीने ४१ चेंडूंचा सामना करीत ४ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६१ धावा केल्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंच व डी’आर्की शॉर्टने सुरेख फलंदाजीचा नमुना पेश करीत भारताच्या प्रमुख गोलंदाजांना खेळून काढत पहिला पावरप्ले एकही गडी  न गमावता काढला. आठच्या सरासरीने पहिल्या पावरप्लेमध्ये या जोडीने बिनबाद ४९ धावांची सलामी दिली. भारताच्या वेगवान गोलंदाजांना बळी मिळत नसल्यामुळे कोहलीने आपलं मोर्चा वळविला तो स्पिनर्सकडे. भारताला मर्यादित षटकांच्या सामन्यात गरजेच्या वेळेस विकेट्स मिळवून देणाऱ्या कुलदीप यादवने पुन्हा एकदा सफल होत फिंचला (२८ धावा, २३ चेंडू) बाद करीत यजमानांना पहिला धक्का दिला. मग उरलेली कामगिरी कृणाल पांड्याने फत्ते केली. त्याने आपल्या चार षटकांत ३६ धावा खर्च करीत ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. आणि त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला सहा बाद १६५ धावांवर रोखले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *