नवी मुंबई:- नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयामध्ये पुरेस औषध पुरवठा होत नसल्या कारणाने शेतकरी कामगार पक्षातर्फे आज नवी मुंबई महापालिका रुग्णालयासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले. स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांसाठी औषधांचा तुटवडा असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्व रुग्णांना बाहेरील खासगी औषध केंद्रातून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत असून, त्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी जिल्हा अध्यक्ष गौतम आगा, जिल्हा उपाध्यक्ष दिपक सिंग, बेलापुर विधान सभा युवा अध्यक्ष विरेंद्र (गुरू) म्हात्रे, कार्यालय चिटणीस गोविंद साळुंखे आणि युथ कार्याध्यक्ष प्रशांत शेलार, विकी ओव्हाळ सचिव नवी मुंबई, संतलाल शर्मा नवी मुंबई उतर भारतीय जिल्हा अध्यक्ष, रमेश तिवारी जिल्हा उपाध्यक्ष उत्तर भारतीय आणि शिष्टमंडळ उपस्थित होते.