रोहा: येथे दिनांक १८ नोव्हेंबर रोजी अखिल भारत हिंदु महासभा रायगड जिल्हा विभागीय बैठक रोहा येथे विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः जिल्ह्यातील आरोग्य सेवा, जिल्ह्यातील अर्धवट असलेली रस्त्यांची कामे, बंद पडलेल्या बँका, हिंदुंचे होणारे धर्मांतरण, विविध विकासकामे तसेच रायगड जिल्ह्यातील गचाळ झालेल्या राजकारणाला हिंदू महासभा कसा पर्याय ठरू शकेल व शिवशाहीला अभिप्रेत असलेले हिंदवी स्वराज्य रायगड जिल्ह्यात कसे स्थापन करता येईल यावर संघटनात्मक चर्चा करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जाता येईल यावर देखील विशेष चर्चा करण्यात आली. या प्रसंगी हिंदू महासभा रायगड जिल्हा अध्यक्ष अरुण माळी, जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर खामकर, रोहा तालुका अध्यक्ष गणेश पवार, तालुका कार्यवाह परेश सिलिमकर, तालुका उपाध्यक्ष सुनील पोळेकर, चंद्रकांत नामदार, जितेंद्र सुटे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील इत्यादी उपस्थित होते.]]>