प्रतिनीधी:- सध्या अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या मृत्युची जणू मालिकाच सुरू आहे.कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक कामगारांचा नोकरीवर असताना अपघातीव बळी जात आहे, तर काहिंना कायमचेच अपंगत्व पत्करावे लागत आहे असाच एक प्रकार नुकताच खोपोली येथील “साईकृपा ईस्पात” या कंपनीमध्ये घडला असून, तीन महिण्यांपुर्वीच शेजारील मध्य प्रदेश या राज्यातून नोकरी-रोजगारासाठी आलेल्या राकेश रामदास साकेत (मयत) या तरुणाचा खोपोली येथील “साईकृपा ईस्पात” कंपनीत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्या कारणाने मृत्यु ओढवला याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेशमधून खोपोली, रायगड येथे आलेला तरुण राकेश रामदास साकेत (मयत) हा नुकताच तीन महिण्यांपूर्वीच “साईकृपा ईस्पात कंपनीत” नोकरीला लागला होता. अपघाताबद्दल पोलिस ठाण्यात जबाब नोंदविणारा, त्याच कंपनीत क्रेन ऑपरेटरचे काम करणारा दिनेशकुमार शिवरतन पासवान याचे म्हणने आहे की, मयत राकेश साकेत याने चुकुन विजेचे दुसरेच फ्युज बंद केल्यामुळे विजेच्या जोरदार धक्क्याने त्याचा मृत्यु ओढावला. हे कारणच संशयाचे वातावरण निर्माण करते. यातून आणखी एक बाब स्पष्ट होते की, कंपनीत कोणतीही कामगार सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही. सहकारी कामगाराने पोलिस ठाण्यात नोंदविलेला जबाब हा कंपनी प्रशासन अथवा पोलिसी दबावामुळे दिला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मयत कामगार राकेश रामदास साकेत यांच्या वारसांस योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी “हिन्दु महासभा” पक्षाचे रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ युवा पदाधिकारी श्री. अभिजीत दरेकर, अभिजीत गोसावी, ज्ञानेश्वर उतेकर, सत्यम कोंडे इत्यादी पदाधिकारी प्रत्येक्ष जातीने लक्ष ठेऊन आहेत. शेवटी एका कष्टकरी कामगाराच्या “मृत्यु”चा प्रश्न आहे. दरम्यान, पोलिस दरबारी नोंदविलेल्या कामगाराच्या जबाबावरून कंपनी प्रशासनाची ” चामडी” वाचविण्याचा पुर्ण प्रयत्न केला गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिवसेंदिवस कष्टकरी कामगारांचे जाणारे बळी हा चिंतेचा विषय असून हिन्दु महासभा पक्षाचे कोंकण प्रांत युवा प्रभारी श्री. अरुण माळी हे हा गंभीर विषय घेऊन लवकरच मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचे लक्ष्य वेधण्यासाठी संबंधितांचे दरवाजे ठोठावणार आहेत.]]>