कोहलीच्या होप्स शाई ने ठेवल्या अपूर्ण

पराक्रमी कोहली दरम्यान, भारतीय कर्णधार कोहलीने मागच्या सामान्याप्रमाणे याही सामन्यात आणखी एका विक्रमला गवसणी घातली. मागच्या सामन्यात वेगवान १०,००० धावांचा पल्ला गाठल्यानंतर या सामन्यात त्याने आणखी एक शतक ठोकले. सलग तीन एकदिवसीय डावांत शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. यायाधी असा पराक्रम श्रीलंकेचा कुमार संगकारा (४ शतके), पाकिस्तानचे झहीर अब्बास, सईद अन्वर, बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचे हर्षल गिब्ज, एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डीकॉक, न्यूझीलंडचा रॉस टेलर व इंग्लंडचा जॉनी बॅरिस्टो यांनी केला आहे. अफलातून धोनी विंडीज व ऑस्ट्रेलियाच्या टी-२० मालिकेतून वगळल्यानंतर निवड समितीवर चौफेर टीका झाली. धोनीने आपली नाराजी कुठेही व्यक्त न करत आज आपल्या खास यष्टिरक्षणच्या कौशल्यातून जणू काही निवड समितीला सडेतोड उत्तर दिले. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराचा एक रिपरवर धोनीने बॅकवर्ड स्केयर लेग बाउंडरी पर्यंत धावत जात मोठी डाइव्ह मारत हेमराजला बाद केले. प्रेक्षकांनी जणू दहा वर्षांपूर्वीचा धोनी अनुभवला. धोनी इथेच थांबला नाही. भारतीय स्पिनर्सची डोकेदुखी ठरलेला शिमरॉन हेटमेयरला आपल्या अनोख्या कौशल्याने यष्टिचित करीत निवड समितीला जणू चपराकच मारली. निवड समितीने धोनीला संघात न घेण्याचं कारण देताना सांगितलं होतं कि संघात नवीन चेहऱ्यांनाही आजमावण्याचा समितीचा मानस आहे. पण क्रिकेट पंडितांच्या मते धोनीला समितीने आराम न देता त्याला संघातून स्पष्टपणे वगळण्यात आलं आहे. एकंदरीतच, धोनीने आपली अफलातून यष्टिरक्षणाची कला दाखवत उपस्थित प्रेक्षकांना खुश केलं आणि निवड समितीला हेही दाखवून दिलं कि शेर अभी जिंदा है.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *