कोहली-जाधवचा नव वर्षात धमाका, केला इंग्लंडच्या ३५१ धावांचा पाठलाग

कर्णधार विराट कोहली व लोकल बॉय केदार जाधवच्या शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडला केले ३ गड्यांनी पराभूत. ३५१ धावांचा विशाल पल्ला गाठीत भारताने रचला आणखी एक विक्रम. धावांचा पाठलाग करीत भारताने आतापर्यंतचा हा दुसरा मोठा विजय ठरला. पुणे: नव्या वर्षात आपला पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने गहुंजे येथील मैदानात प्रारंभ करीत प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा यांना बसवत बऱ्याच काळाने पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंघला अंतिम संघात स्थान देण्यात आले. कर्णधार विराट कोहलीने आपल्या नवख्या गोलंदाजांकडून डावाची सुरुवात केली. इंग्लंडकडून जेसन रॉय व अलेक्स हेल्स यांनी डावाची दमदार सुरुवात करीत भारतीय गोलंदाजांना सुरुवारीपासूनच दबावात टाकले. सामन्याचे तिसरे षटक चालू असताना पंचांनी रॉयला उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद दिले खरे परंतु इंग्लंडने घेतलेल्या रिव्हूमध्ये त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श न झाल्याचं दिसलं आणि रॉयला एक प्रकारे जीवनदान भेटले. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने भारतीय गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करीत इंग्लंडला सुरुवातीपासूनच मोठ्या धावासंखेकडे नेले. सातव्या षटकात दुसरी धाव घेण्याच्या नादात बुमराने केलेल्या एका अचूक थ्रोवर हेल्स बाद झाला आणि इंग्लंडला पहिला धक्का मिळाला. पहिला गडी बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूटने रॉयसोबत चांगली फटकेबाजी करीत इंग्लंडला १० षटकांत ६७ धावा जमवून दिल्या. तत्पूर्वी रॉयने ३६ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने आपले गोलंदाज अदलून बदलून इंग्लंडला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही. दुसर्या गड्यासाठी रॉय व रूटने ६९ धावांची भागीदारी रचित इंग्लंडला १०० धावांचा पल्ला गाठून दिला. जेसन रॉयने एक रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला परंतु शॉर्ट थर्ड मॅनला उभ्या असलेल्या उमेश यादवला चेंडू पकडता आला नाही व रॉयला एक जीवनदान मिळाले. इंग्लंडविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाने भारताला दुसरे यश मिळवून देत रॉयला बाद केल्या. रॉयने ६१ चेंडूंत १२ चौकारांसह ७३ धावा केल्या. रॉय बाद झाल्या नंतर इंग्लंड संघाचा कर्णधार इयान मॉर्गनने रूटसह सामन्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. मॉर्गनने एकेरी दुहेरी धावा घेत व मिळणाऱ्या चेंडूवर आक्रमण करीत बाद होण्यापूर्वी २६ चेंडूंत २८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने यष्टीरक्षक धोनीकरवी त्याला रिव्हू घेत बाद केले. जो रूटने आपला फॉर्म चालू ठेवत आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याचे हे एकदिवसीय सामन्यांतील १८ वे अर्धशतक झाले. जोस बटलर व रूट ने चौथ्या गड्यासाठी ६३ धावा जमावात इंग्लंडला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. पांड्याने बटलरला ३१ धावांवर बाद केले तर लगेच बुमराने विस्फोटक रूटला ७८ धावांवर बाद करीत पाहुण्यांना अडचणीत आणेल. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने उरलेल्या षटकांत चौफेर फलंदाजी करीत इंग्लंडला मोठ्या धावसंखेकडे नेले. स्टोक्स बाद होण्यापूर्वी त्याने केवळ ४० चेंडूंत २ चौकर व ५ उत्तुंग शतकारांसाहित ६२ धावा केल्या. सातव्या क्रमांकावर आलेल्या मोईन अलीनेही भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करीत इंग्लंडला निर्धारित ५० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात ३५० धावांचा पल्ला गाठून दिला. भारतातर्फे पांड्या, बुमरा यांना प्रत्येकी २ तर यादव जडेजा यांना प्रत्येकी १ गडी बाद करता आला. इंग्लंडने भारताविरुद्ध केलेल्या या आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा होत्या. यापूर्वी त्यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत बंगळूरू येथे ३३८ धावा केल्या होत्या आणि तो सामना बरोबरीत सुटला होता. प्रती उत्तरादाखल उतरलेल्या भारतीय डाव सुरुवातीलाच गडगडला. रोहित शर्माच्या अनुपस्थित संधी मिळालेला के. एल. राहुल तर दुखापतीतून सावरलेल्या शिखर धावनेन भारतीय डावाची सुरुवात केली. ३५१ धावांचा विशाळ डोंगर रचल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघासमोर टिच्चून गोलंदाजी केली. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विलीने धवनला केवळ एका धावेवर बाद केले आणि लगेचच सहाव्या षटकात राहुलचा त्रिफळा उडवीत भारताला दुसरा धक्का दिला. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या युवराज सिंघने कर्णधार कोहलीच्या साथीने काही धावा जमवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ३२ धावांची भागीदारी रचली. युवराज फॉर्मात दिसत असतानाच स्टोक्सने बटलरकरवी युवराजला बाद केले आणि भारताला ११ व्या षटकात तिसरा धक्का दिला. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या धोनीने चौकारासह आपले खाते खोलले. कोहली-धोनी ही आजी-माजी कर्णधारांची जोडी जमेल असे वाट असताना एक मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी केवळ ६ धावा करून बाद झाला. केवळ ६४ धावांत आघाडीचे ४ फलंदाज तंबूत परतले असताना भारत हा सामना हरेल अशी भीती वाटू लागली. ३५१ धावांचा विशाल लक्ष्य पार करताना भारताला इंग्लंडच्या गोलंदाजांनी अक्षरशा वेठीस आणले. एकीकडे भारताचे ठराविक अंतरावर गडी बाद होत असताना दुसरीकडे कर्णधार कोहलीने एक बाजू पकडून ठेवली. सहाव्या क्रमांकावर आलेल्या लोकल बॉय केदार जाधवने आपल्या घराच्या प्रेक्षकांना भरपूर मनोरंजीत केले. कोहलीच्या साथीने त्याने एका मागोमाग पल्ला गाठत भारताला मजबूत स्थितीत आणेल. कोहलीने संयमी फलंदाजी करीत ४४ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. केदार जाधवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेत २९ चेंडूत आपले अर्धशतक लगावले. कोहलीने धावफलक पाहत आवश्यक त्या गतीने धावा जमवल्या आणि आपले कारकिर्दीतील २७ वे शतक लगावले. एका उत्तुंग षटकारासह त्याने शतक लगावले. धावांचा पाठलाग करताना कोहलीचे हे १७ वे शतक आहे. त्याने याच शतकाबरोबर सचिन तेंडूलकरच्या पाठलाग करताना केलेल्या १७ शतकांची बरोबरी केली. केदार जाधवानेही एक खणखणीत चौकार खेचीत आपले दुसरे शतक लगावले आणि भारताच्या आशा उंचावल्या. केवळ ६५ चेंडूत त्याने ही किमया करीत अजून एका विक्रमाला गवसणी घातली. भारतातर्फे हे पाचवे वेगवान शतक ठरले. दरम्यान कोहली-जाधवने पाचव्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी रचली. हीच भागीदारी भारताला विजय प्राप्त करण्यासाठी पूरक ठरली. दोघांची जोडी जमलेली दिसत असताना कोहली एक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला आणि भारतला पाचवा धक्का बसला. केदार जाधव काही काळ अस्वस्थ दिसत असताना केवळ चौकार षटकार मारत धावा जमवू लागला. जाधवही मोठा फटका मारताना सिमेरेषेजवळ बाद झाला आणि भारत पुन्हा अडचणीत आला. एका बाजूने हार्दिक पांड्याने भारताची बाजी टिकून ठेवली तर आलेल्या रवींद्र जडेजाने केवळ १३ धावांचं योगदान देत भारताला सातवा धक्का दिला. भारताची भक्कम असलेली फलंदाजी या वेळेस कमी आली आणि एका विशाल लक्ष्याला भारताने गवसणी घातली. हार्दिक पांड्याने या वेळेस अगदी संयमी फलंदाजी करीत ३७ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह महत्वपूर्ण ४० धावांचं योगदान दिल. ४९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत अश्विनने मोईन अलीला एक उत्तुंग असा षटकार खेचीत भारताला विजयश्री खेचून आणलं. भारताने इंग्लंडविरुद्ध आपला सर्वोत्तम पाठलाग करीत ३ गडी व ११ चेंडू राखीत दणदणीत विजय मिळवून दिला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *