जिओटीव्ही भारतभर विंटर ऑलिम्पिक गेम्स २०१८ चे लाईव्ह प्रसारण करणार

मुंबई : भारतात लाखो वापरकर्त्यांची संख्या असलेला जिओ टीव्ही या एप्लिकेशनला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (आयओसी) मार्फत ऑलिम्पिक विंटर गेम्स येऑनचॅंग प्रदर्शित करण्याचे डिजिटल हक्क मिळाले आहेत. जिओ टीव्ही आणि आयओसी या खेळांच प्रसारण संपुर्ण भारतभरात मोबाईल डिव्हाईसवर करणार आहेत. ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान साऊथ कोरियातील येऑनचॅंग या शहरात ऑलिम्पिक विंटर गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये एकुण १०२ इव्हेंट्सचा आणि १५ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्काईंग, स्केटींग, ल्युग, स्काय जंपिंग, आईस हॉकी, स्नो बोर्डिंग अशा खेळांचा यामध्ये समावेश आहे. जगभरातून तब्बल ९० देश यामध्ये सहभागी होत आहेत, यामध्ये भारताचाही समावेश आहे. म्हणुनच जिओ टीव्हीच्या माध्यमातून अनेक एक्सक्लुसिव्ह चॅनेल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा उपयोग हा २४x७ लाईव्ह एक्शन स्ट्रिमिंगसाठी होईल. तसेच कॅच अप फीचरच्या माध्यमातून या खेळाच पुर्नप्रसारणही पाहता येईल. इव्हेंट कव्हरेजमध्ये लाईव्ह ब्रॉडकास्ट, हायलाईट पॅकेज, रिपिट प्रोग्रामिंग यासारख्या फीचरचा समावेश आहे. ऑलिम्पिकच चॅनेलही भारतभर लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय देणार आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *