महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभा युवा प्रसिद्धीप्रमुख पदी हिंदुत्वनिष्ठ जयेश मेस्त्री यांची नियुक्ती

मुंबई. हिंदु महासभा युवा प्रदेश कार्यकारीणी समिती च्या वतीने मुंबई येथील तरुण तडफदार वक्ता, कवी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, कलाकार, पत्रकार श्री. जयेश मेस्त्री यांची”महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभा युवा प्रसिद्धी प्रमुख” पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जयेश मेस्त्री हिंदुत्वनिष्ठ असुन ते विविध हिंदुत्ववादी उपक्रमात सहभागी असतात. हिंदुमहासभा पक्षास प्रसिद्धीझोतात आणण्याचे दायित्व त्याच्यावर सोपविण्यात आले आहे.प्रदेश युवा प्रभारी राकेश हिंदुस्थानी आणि प्रदेश युवा अध्यक्ष शिवराज चंदापुरे पाटील यांच्या संमतीने आणि सर्वानुमते जयेश मेस्त्री यांची”महाराष्ट्र प्रदेश युवा प्रसिद्धी प्रमुख” पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यावेळी हिंदु महासभायुवा सदस्य अरुण माळी(रायगड), उमेश केळुसकर(मुंबई),ज्ञानराज भालेराव(सोलापूर), प्रसाद करकरे(मुंबई), सचिन साळसकर(ठाणे), दत्तात्रेय कानडे(मुंबई), विलिन शेळके(ठाणे), हरीष निकम(मंबई), पराग वैद्य(ठाणे), गुरुजी गोडबोले(ठाणे), अविनाश ठोंबरे(ठाणे), महेश जोशी(ठाणे), सौ. केळुसकर(मुंबई),रमेश पावगे(ठाणे) इत्यादींनी जयेश मेस्त्री यांना अनुमोदन दिले.जयेश मेस्त्री दायित्व स्वीकारताना म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील “अखंड भारत निर्माण” करण्यासाठी प्रचार-प्रसार-प्रसिध्दी माध्यमाव्दारे हिंदु युवांचे राजकीय संघटन आणि सैनिकीकरण करीन.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *