जळगाव रोटरी इस्टच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप

जळगाव: ज्या कुटूंबात कर्ता पुरुष नाही अशा कुटंबातील महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीन वाटपाचा रोटरी जळगाव ईस्ट चा उपक्रम महिलांना सक्षम बनविणारा असल्याचे गौरवोद्गार महसुल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. रोटरी जळगाव ईस्ट च्या वतीने येथील रो.भैय्यासाहेब लुंकड हॉल येथे महिलांना शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम ना. पाटील यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, उदय वाघ, रोटरी जळगांव चे अध्यक्ष संजय शहा, विजय लाठी, हरीष उपाध्याय उपस्थित होते. यावेळी ना.पाटील म्हणाले की, रोटरी जळगाव ईस्ट ने समाजाची गरज ओळखून शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमामुळे निराधार कुटूंबातील महिलांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी मदत होणार आहे. रोटरीचे उपक्रम नेहमीच समाजाला दिशा देणारे असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे या महिलांना स्वाभिमानाने जगण्यास मदत होणार आहे. रोटरी जळगाव ईस्ट च्या वतीने समाजातील निराधार ५४ महिलांना शिलाई मशीन वाटण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष संजय शहा यांनी दिली. यावेळी ना. पाटील यांच्या हस्ते प्रातनिधीक स्वरुपात ५ महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास रोटरी चे पदाधिकारी तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *