दुर्दैवी मुंबईवर जमशेदपूर ठरला भारी

मुंबई: मागच्या सत्रात आपल्या पदार्पणात पाचव्या स्थानी असलेल्या जमशेदपूर एफसीने यंदाच्या मोसमात जिंकण्याच्या इराद्यात मैदानात उतरत तगड्या मुंबई सिटी एफसीवर त्यांच्याच घराच्या मैदानावर  पहिल्या हाफमध्ये बाजी मारली. पहिल्या हाफमध्ये तर जवळपास ६१% चेंडूंचा ताबा जमशेदपूरने मिळवत मुंबईला सळो कि पळो करून सोडले. मुंबईला दोनदा संधी मिळाल्या खऱ्या पण एकदाही त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तर दुसरीकडे जमशेदपूरने मिळालेली एकमेव संधी अचूकरीत्या साधत २८ व्या मिनिटाला गोल करीत पूर्ण केली. कार्लोस कार्वोच्या पासवर मारिओ अर्कवेसने मुंबईचा दिमाखदार गोलकिपर अमरिंदर सिंगला चकवत जमशेदपूरचं खातं उघडलं. तत्पूर्वी, सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला जमशेदपूरला फ्री-किक मिळाली. जवळपास ४० यार्डच्या अंतरावरून कार्लोस कार्वोला हा गोल करायचा होता परंतु ते काही जमलं नाही. अंधेरीच्या मुंबई फुटबॉल अरेनामध्ये प्रेक्षकांनी भरलेल्या सर्वच स्टॅण्डमध्ये मुंबईला भरभरून प्रतिसाद मिळत होता. पण प्रत्यक्ष मैदानात मात्र जमशेदपूर मुंबईवर भारी होताना दिसत होतं. सामन्याच्या २२व्या मिनिटाला जमशेदपूरचा तिरी मुंबईच्या मोडुऊ सौगुउकडून चुकीच्या पद्धतीने चेंडूवर ताबा मिळवत असताना पंचांनी नेमकेच पकडले आणि सामन्याचा पहिला यलो कार्ड देण्यात आला. पहिल्या हाफअखेरीस जमशेदपूर सिटी एफसी १-० अश्या आघाडीवर होते. घराच्या मैदानावर काहीशी संमिश्र अशी कामगिरी करणाऱ्या मुंबई सिटी एफसीला नवे कोच जॉर्ज अलमेडीया यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामगिरी करण्याचं आव्हान या पाचव्या सत्र आहे. केवळ तिसऱ्या सत्रातील कामगिरी वगळता मुंबईला पाहिजे तशी कामगिरी आतापर्यंत करता आलेली नाही. मागच्या सत्रातही दहापैकी सातव्या स्थानी राहिलेल्या मुंबई सिटी एफसीला सलामीच्या सामन्यातही काहीसा तसाच अनुभव आला. खेळातही नशिबाची साथ लागते याचा जागता जिवंत प्रत्यय आला तो मुंबई सिटी एफसीला. ७७व्या व ८४व्या मिनिटाला मुंबईने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला खरा पण ऑफ-साईडमुळे दोन्ही वेळेस पंचानी हे गोल अवैध ठरवले. परिणामी मुंबईला दोन्ही वेळेस गोलपासून वंचित राहावं लागलं. ८४व्या मिनिटाच्या गोलच्या वेळेस मुंबईने अप्रतिम फ्री-किक गोलमध्ये रूपांतरित केली पण ऑफ-साईडमुळे गोल दिला नाही. त्यात भर ती काय, अतिरिक्त मिळालेल्या वेळेतही जमशेदपूरने गोल करीत मुंबईचा कस काढला. पाब्लो मार्गाडो याने यावेळेस जमशेदपूरची आघाडी भक्कम केली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *