रोहितचा दणका कोहलीवर भारी

४६ धावांनी मिळवलेल्या विजयासह मुंबई इंडियन्सने उघडलं विजयाचं खातं सुरुवातीचे सामने हरणे जणू परंपरा बनलेल्या मुंबई इंडियन्सला आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. मागच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हवी तशी छाप न सोडलेल्या अकिला धनंजयाला वगळून मुंबई इंडियन्सने आपला नेहमीच अष्टपैलू खेळाडू मिचेल मॅकग्लेनेघनला संधी दिली. तर मागच्या सामन्यातील सलामीची जोडी आजही कायम ठेवली. भारतीय संघासाठी गेली काही वर्षे सातत्य दाखवणाऱ्या उमेश यादवला विराट कोहलीने चेंडू सोपवला आणि त्याने कर्णधाराला खरे ठरवले. सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांना क्लीन बोल्ड करीत बँगलोरला धुमधडाक्यात सुरुवात करून दिली. एरव्ही मधल्या फळीत फलंदाजीस येणाऱ्या रोहित शर्माला आज मात्र मधल्या फळीतच पण सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूचा सामना करावा लागला. कोहलीने क्रिस वोक्सला दुसरे षटक दिले आणि शर्मा-लुईस जोडीने १२ धावा कुटत पहिल्या षटकातील झालेल्या नुकसानाचा काहीसा दबाव कमी केला. चौथे षटक वॉशिंग्टन सुंदरकरवी करण्याचा कोहलीचा निर्णय महाग ठरला. या षटकात १९ धावा कुटत मुंबई इंडियन्सने दबाव आणखी कमी केला. पावरप्ले अखेरीस मुंबईने धावसंख्या २ बाद ६३ वर नेऊन ठेवली. बँगलोरच्या स्पिनर्सचा पुरेपूर समाचार घेत रोहित-लुईस जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ६६ चेंडूंत १०८ धावांची शतकीय भागीदारी रचली. दरम्यान, लुईसने ४२ चेंडूंत ६ चौकार व ५ उत्तुंग षटकार खेचत ६२ धावांचा मौल्यवान योगदान दिलं. मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटचा कडा घेतला आणि यष्टीरक्षक डीकॉकने अचूक झेप टिपला. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप महत्व असतं हे आपल्याला यंदाचा आयपीएलला दाखवून दिलंय. शतकीय भागीदारीनंतर कृणाल पांड्या व रोहित शर्माने २५ चेंडूंत ४० तर रोहित-पोलार्डने १६ चेंडूंत ३० धावांची भागीदारी रचित मुंबईला एका आव्हानात्मक धावसंख्येकडे वळवले. मागील तीन सामन्यांत चांगल्या सुरुवातीनंतही अडखळणारी मुंबई इंडियन्स आज वेगळ्याच रंगात होती. शेवटच्या १० षटकांत ११८ धावा कुटत धावसंख्या २१३ वर आणली. मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं ते त्यांचा कर्णधार रोहित शर्माने गवसलेला फॉर्म. ५२ चेंडूच्या वादळी खेळीत त्याने तब्बल १५ वेळेस चेंडूला सीमारेषेपलीकडे धाडलं. यात पाच षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकात दोन चौकार व एक षटकार मारून आता शतक पूर्ण करेल कि असे दिसत असताना षटकाच्या पाचव्या चेंडूवर लॉन्ग ऑफला उभ्या असलेल्या वोक्सकडे झेल देत ९४ धावांवर तो बाद झाला. तीनपैकी दोन सामने गमावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मुंबईप्रमाणे आजचा विजय महत्वाचा होता. मुंबईने जसप्रीत बुमराला चेंडू सोपवत डावाची सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूने दवाचा परिणाम स्पिनर्सवर पडू नये म्हणून कृणाल पांडयाला चेंडू दिला. दुसऱ्या षटकात १३ धावा ठोकत बँगलोरने आपणही धावांचा पाठलाग करण्यास सज्ज आहोत असे दाखवले. चार षटकांत ४० धावा कुटल्यानंतर  मिचेल मॅकग्लेनेघनने एकाच षटकात डी-कॉक व घातक डिव्हिलियर्सला चालते करत मुंबईच्या प्रेक्षकांना नाचण्याची आणखी एक संधी दिली. पावरप्लेपर्यंत बँगलोरची गाडी दोन बाद ५५ पर्यंत येऊन पोचली. मुंबईच्या डावात बँगलोरच्या स्पिनर्सनी पाच षटके गोलंदाजी केली आणि ६४ धावा दिल्या. विकेट्सचा विचार केला तर त्यांना एकही मुंबईच्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं नाही. उलट घडलं ते बँगलोरच्या डावात. मुंबईच्या वानखेडे मैदानावर रात्रीच्या खेळामध्ये दव पडून दुसऱ्या डावात स्पिनर्सना गोलंदाजी करणे खूपच कठीण होतं. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ते अनुभवलेही होते. आज मात्र स्थिती काहीशी वेगळी होती. मुंबईच्या स्पिनर्सनी बँगलोरला अगदी जखडून ठेवले होते. कृणाल पांड्याने दहाव्या षटकात मनदीप सिंग व कोरी अँडरसन यांना सलगच्या चेंडूवर बाद करीत चांगलाच हादरा दिला. ईशान किशनला गंभीर दुखापत बँगलोरच्या डावाचा १३ व्या षटकाचा चेंडू हार्दिक पांड्याने मिड विकेटवरून ईशान किशनकडे फेकला. ईशान किशनचा चेंडू पकडताना अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या उजव्या डोळ्याखाली आदळला. चेंडूचा वेग इतका होता कि ईशान किशन जागीच कोसळला. त्याच्या होणाऱ्या वेदना पाहून मुंबई इंडियन्सच्या चमूत एकाच शांतता पसरली. काहीश्या इलाजानंतर त्याला लगेच इस्पितळात हलवण्यात आलं. Ishan Kishan   कर्णधार कोहलीने एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु इतर फलंदाजांचा फारसा सहभाग न मिळाल्यामुळे बँगलोरच्या गोत्यात पुन्हा एकदा निराशाच आली. आश्चर्याची बाब म्हणजे कोहलीचा (६२ चेंडू ९२ धावा) अपवाद वगळता एकही फलंदाजाला साधा २० चा आकडाही गाठता आला नाही. मुंबईतर्फे कृणाल पांड्याने ३, बुमरा, मॅकग्लेनेघनला प्रत्येकी २ तर मार्कंडेयला १ गडी बाद करण्यात यश आलं. याच विजयाबरोबर मुंबई इंडियन्सने यंदाच्या सत्रात आपलं विजयाचं खातं उघडलं. पहिला तीन सामन्यांतील जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने या सामन्यात मात्र एक हाती विजय मिळवला हेही तितकेच विशेष.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *