मुंबईकरांनी जिंकला पुण्याचा गड

सततचे पराभव जिव्हारी घेत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घराच्या (पुण्याच्या) मैदानात आठ गड्यांनी पराभूत करीत आयपीएल मधला आपला दुसरा विजय नोंदवला. पुणे: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधले दोन तुल्यबळ संघ आज एकमेकांशी भिडले. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध पुण्यात प्रथम फलंदाजी करीत धमक्यात सुरुवात केली. पहिल्या चार षटकांत केवळ २४ धावा धावफलकावर लागवल्यानंतर चेन्नईचे सलामीवीर अंबाती रायडू व शेन वॉटसन यांनी आक्रमक पवित्र घेण्याचा प्रयत्न केला. याच घाईत वॉटसन (१२ धावा, ११ चेंडू) कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर झेल देत बाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकनावर आलेल्या सुरेश रैनाने पाचव्या व सहाव्या षटकांत पांड्या ब्रदर्सना २७ धावा कुटत पावरप्ले अखेरीस धावसंख्या एक बाद ५१ वर आणली. खराब कामगिरीतुन जात असलेल्या किरॉन पोलार्डला मुंबईने आज डच्चू दिला तर मुस्ताफिझूर रहमानच्या जागी बेन कटिंगला संधी देत मुंबईने दोन बदल केले. सहापैकी पाच सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला स्पर्धेतील अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा होता. त्याच अनुषंगाने कर्णधार रोहित शर्माने आपल्या गोलंदाजीत वारंवार बदल केले. पहिल्या सहा षटकांत चार गोलंदाज वापरले तर बेन कटिंगला नवव्या षटकात आणले. काही अंशी रोहितचा हा प्रयत्न योग्यही ठरला परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या रायडूने पुह्ना एकदा आपला खेळ प्रदर्शित करीत मुंबईच्या गोलंदाजांची पिटाई केली. त्याला उत्तम साथ दिली ती सुरेश रैनाने. मुंबईसाठी यंदाच्या मोसमात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेल्या मयांक मार्कंडेला मोठे फटाके खेचत दबावात टाकले. दरम्यान, रायडूने मोसमात ३०० धावा करीत आयपीएलमध्ये सहाव्यांदा अशी कामगिरी केली. टी-२० क्रिकेटमध्ये छोट्या-छोट्या भागीदाऱ्याही खूप महत्वाच्या ठरतात. हीच बाब रैना व रायडू यांनी गंभीररीत्या घेत तिसऱ्या गड्यासाठी ४२ चेंडूंत ७१ धावा रचल्या. पण पुढच्या फलंदाजांना पाहिजे तशी कामगिरी करण्यात अपयश आल्यानं १९०-२०० दिसणारा धावांचा डोंगर मुंबईच्या गोलंदाजांना रोखण्यात यश आलं. दहा षटकानंतर एक बाद ९१ अशी चांगली अवस्था असलेल्या चेन्नई सुपर किंगला १६९ धावांवरच समाधान मानव लागलं. यातील १२ ते १४ षटकांमध्ये मुंबई इंडियन्सने केवळ ९ धावा देत १ गडी बाद केला. जसप्रीत बुमराने तर १३ व्या षटकात केवळ एकच धाव देत धावगातील लगाम लागण्यास मदत केली. रैनाचा (नाबाद ७५) अपवाद वगळता धोनी (२६), ब्रावो (०), सॅम बिलिंग्स (३) यांना हव्या तश्या धावा करता आल्या नाही. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्पा टाकत चेन्नईच्या धावगतीला रोख लावला. मिचेल मॅकक्लेनेघन (२६ धावांत २), कृणाल पांड्या (३२ धावांत २) व हार्दिक पांड्या (३९ धावांत १) बळी घेत पुण्याच्या फलंदाजीस पूरक अश्या खेळपट्टीवर समाधानकारक गोलंदाजी केली. पुण्याच्या स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध मुंबई सामना पाहण्यासाठी पुणेकरांबरोबरच मुंबईकरांनीही विशेष हजेरी लावली. येथे झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (१४००० प्रेक्षक) सामान्याच्या तुलनेत आज तब्बल २८५०० प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली. पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीने कोणतीही घाई न करता सावध पवित्रा आजमवला. पहिल्या पावरप्लेअखेरीस बिनबाद  ५० अशी सुरुवात करीत विजयाकडे कूच करण्याचे संकेत दिले. चेन्नईच्या गोत्यात आणखी भर पडली ती दीपक चाहरची. पाचव्या षटकात दुखापतीमुळे त्याला मैदानाच्या बाहेर जावे लागले. सूर्यकुमार यादव व एव्हीन लेविस यांनी ५९ चेंडूंत ६९ धावांची सावध सलामी देत डावाची आखणी चांगली केली. दहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हरभजनच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटला रवींद्र जडेजाने एक सुरेख झेल पकडत मुंबईची सलामी जोडी फोडली. यादवने ३४ चेंडूंत पाच चौकार व एक षटकार खेचत ४४ धावा केल्या. दहा षटकानंतर जिथे चेन्नईच्या ९१ धावा झाल्या होत्या तिथे तुलनेत मुंबईच्या केवळ ६९. मुंबईला आता १० च्या सरासरीने धावा जमवण्याच्या होत्या. अशातच कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या क्रमांकावर बढती घेत लेविसच्या साथीने डाव सावरला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ३८ चेंडूंत महत्वपूर्ण ५९ धावांची भागीदारी रचली. १४ व्या षटकात रोहितने वॉटसनला दोन अप्रतिम षटकार खेचत सामन्यात रोचकता वाढवली. त्यातला एक षटकार त्याने स्वीप करीत मारला. १७ व्या षटकात ब्रावोने लेविसला ४७ धावांवर बाद करीत मुंबईची आणखी एक भागीदारी फोडली. लेविसने आपल्या ४३ चेंडूच्या खेळीत ३ चौकार व २ षटकार खेचत मुंबई इंडियन्सला विजयाकडे कूच केले. रोहितने मग हार्दिक पांड्याच्या जोडीने उरलेसुरलेली कसर पूर्ण करीत २ चेंडू व ८ गडी राखत मुंबईच्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. ३३ चेंडूच्या खेळीत रोहितने ६ चौकार व २ षटकार खेचत नाबाद ५६ धावा केल्या. हार्दिक ८ चेंडूंत १३ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईकडून हरभजन सिंग व ब्रावोचा अपवाद वगळता एकही गोलंदाजाला यश प्राप्त करता आलं नाही. वॉटसन (४१) व शार्दूल ठाकूर (३८) यांच्या सुमार कामगिरीचा फटका चेन्नईला बसला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *