मुंबईचा घराच्या मैदानावर पराभव, कोलकाताचा विजयाचा दुष्काळ संपुष्टात

इंडियन सुपर लीगच्या २७ व्या सामन्यात अटलाटीको दि कोलकाताने मुंबई सिटी एफ. सी. ला त्यांच्याच घराच्या मैदानावर मात देत यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबई: दोन वेळचा चॅम्पियन संघ अटलाटीको दि कोलकाता यंदाच्या सत्रात जरी शेवटच्या स्थानी असला तरी मुंबई सिटी एफ. सी. ला नेहमीच तोडीसतोड उत्तर देण्यास प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीच्या संघाने आज मुंबईला त्यांच्याच घराच्या मैदानावर चांगलीच टक्कर दिली. या सत्रात विजयाचे खातं उघडण्यास अजूनही मागे असलेल्या ए. टी. के. ने आज मुंबई सिटी एफ. सी. ला पूर्वार्धात आज चांगलीच टक्कर दिली. जवळजवळ सर्वच क्षेत्रात मुंबईच्या वरचढ असलेल्या कोलकाताने आपल्या प्रमुख खेळांडूंसह मैदानात उरतण्याचा निर्णय घेतला. चेंडूवर ताबा ते गोल करण्यास अचूक निशाणा; कॉर्नर, टचेस ते अगदी क्रॉसेस – कोलकाता आज पहिल्या हाफमध्ये मुंबईवर सर्वच विभागात सर्रास ठरला. पाचव्या मिनिटाला फ्री-किक मिळवत कोलकाताने आपले इरादे स्पष्ट केले. या इराद्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी मुंबईच्या बळवंत सिंगने आपला सर्वोत्तम खेळही पेश केला. ए. टी. के. च्या रेयान टेलरने मिळालेल्या पासेसचा उत्तम प्रकारे फायदा घेत कोलकाताला वारंवार गोल करण्याची संधी प्राप्त करून दिली. परंतु मुंबईचा अनुभवी गोलकपर अमरिंदर सिंगने त्याचाही उत्तम खेळ सादर करीत कोलकाताचे प्रयत्न हणून पाडले. दरम्यान, मुंबईचा अभिनाश व कोलकाताचा रुप्रेत यांना यलो कार्ड मिळालं. कोलकाताला पहिल्या हाफच्या वाढीव वेळेतही कॉर्नर मिळालं परंतु मुंबईच्या बचाव फळीपुढे त्यांचं काहीही टिकलं नाही आणि पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सोडवण्यात मुंबई यश मिळालं दुसरा हाफ: कोलकाताची आघाडी, मुंबईवर भारी अगोदरच मोसमातील महिला विजयासाठी आतुर असलेल्या ए. टी. के. ला आजच्या सामन्यात विजय मिळवून आशा कायम ठेवण्याचं आव्हान होत. उत्तरार्धात भारताचा अनुभवी रॉबिन सिंग याने ए. टी. के. ला ५४ व्या मिनिटाला गोल करून देत महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मुंबईच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात उपस्थित ए. टी. के. च्या समर्थकांनी रॉबिन सिंगच्या या गोलबरोबरच मेडिया बॉक्सच्या बाजूस असलेल्या स्टॅन्डमध्ये एकच जल्लोष केला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा जमवलेल्या ए. टी. के. ने मुंबईवर याही सत्रात वर्चस्व गाजवले. शेवटच्या काही मिनिटांत मुंबई सिटी एफ. सी. ने छोट्या मोठ्या मिळालेल्या संधींचा फायदा घेत गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु कोलकातानेही तितक्याच चतुराईने कडा जबाब देत मुंबईला गोल करण्यापासून रोखलं. याच विजयाबरोबर कोलकाताने या सत्रात पडलेला विजयाचा दुष्काळ अखेर संपुष्ठात आणत प्रेक्षकांना विजयाची चव चाखवली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *