कोहली, विजयाच्या शतकाने भारत तिसर्‍या दिवसाअखेरीस मजबूत स्थितीत

मुंबई(दि. १० डिसेंबर, २०१६): इंग्लंडला ४०० धावांवर बाद करून काल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने कालच्या दिवसाअखेरीस १ गडी बाद १४६ धावा केल्या होत्या. भारताचा भरवश्याचा सलामी फलंदाज मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी डावाची सुरुवात केली. आजच्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर पुजारा बॉलच्या एका आउट स्विंगवर त्रिफाळाचीत झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. पुजारा बाद झाल्यानंतर फॉर्मात असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आणि उपस्थित प्रेक्षकांनी मोठ्या जोशात त्याचे स्वागत केले. कोहली विजयने भारतासाठी पटापट धावा जमवल्या व ६६ व्या षटकात संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. विराट कोहलीने यंदाच्या वर्षातील आपल्या १००० धावा पूर्ण करीत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय व जगातील चौथा फलंदाज ठरला. दुसरीकडे अतिशय शांत व चलाखीने खेळणाऱ्या विजयने महत्वपूर्ण असे ८ वे कसोटी शतक लगावत भारताला एका भक्कम स्थितीत आणून ठेवले. वानखेडेवर शतक ठोकणारा तो गावस्कर व सेहवाग यांच्यानंतर तिसरा सलामी फलंदाज ठरला. विजयाचे शतक होताच कोहालीनेही आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४००० धावा पूर्ण केल्या. सुरुवातीपासूनच रिव्हिव्यूच्या विरोधात असणार्‍या भारतीय संघाला एक जीवनदान मिळाले. विजयाला पंचानी बाद दिल्यानंतर घेतलेल्या रिव्हिव्यूमुळे त्याला जीवनदान मिळाले. सत्र संपण्याआधी कोहली-विजय यांनी तिसर्‍या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी पूर्ण केली. सकाळच्या सत्रअखेरीस भारताने २ गडी गमावत २४७ धावा केल्या होत्या. सकाळच्या चांगल्या सत्रानंतर भारताची अवस्था काहीशी गडबडल्या सारखी झाली. भारताच्या २५० धावा झाल्या आणि शतकवीर मुरली विजय १३६ धावा करून आदिल रशिदला त्याच्याच गोलंदाजीवर एक सोपा झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेल्या करुण नायरने कर्णधार कोहलीच्या साथीने धावा जमवण्याचा प्रयत्न केला परंतु तोही मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. दरम्यान कोहलीने आपले १५वे कसोटी अर्धशतक झळकावले. नायरनंतर आलेल्या पार्थिव पटेलने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही रूच्या गोलंदाजीवर बाद झाला. पटेलने ३१ चेंडूत १५ धावा केल्या. पटेल बाद झाल्यानंतर आलेल्या अश्विनला खातही खोलात आलं नाही. रूटने अश्विनला बाद करीत भारताला अडचणीत आणले. आठव्या क्रमांकावर रवींद्र जडेजाने कोहालीस धावा जमवून भारताला चहा पर्यंत समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. भारताने चहापर्यंत ६ गडी बाद ३४८ धावा केल्या. कोहली ८३ तर जडेजा २२ धावा करून नाबाद होते. तिसर्‍या सत्रात कोहली जडेजा जोडीने भारताला ३५० धावांचा पल्ला गाठून दिला. लगेच या जोडीने ५० धावांची भागीदारी केली. फुल फॉर्मात असलेल्या कोहलीने या मालिकेतील ५०० धावांचा पल्ला गाठला. जडेजा लयमध्ये दिसत असताना एक मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. कोहलीने एका बाजूने आपली तंत्रशुद्ध फलंदाजी चालू ठेवत अजून एक शतक ठोकले. कोहलीचे हे कसोटी क्रिकेट मध्ये १५ वे तर कर्णधार म्हणून ८ वे शतक लगावले. नवव्या क्रमांकावर आलेल्या जयंत यादवने आपल्या कर्णधाराला चांगली साथ देत भारताला इंग्लंडच्या ४०० धावांचा पल्ला गाठून सामन्यात आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ७ बाद ४५१ धावा करून ५१ धावांनी आघाडीवर होता. कोहली १४७ तर जयंत यादव ३० धावा करून नाबाद होते.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *