भारत वि इंग्लंड: पहिल्या दिवशी जेनिंग्सचं पदार्पणात शतक तर अश्विनचे चार बळी

मुंबई (८ डिसेंबर, २०१६): मालिकेत २-०  आघाडीवर यजमान भारतीय संघ आज पाहुण्या इंग्लंड संघाचे आव्हान पेलण्यासाठी पुरेपुर तयारीनिशी सज्ज झाला. मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामान्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना येथे खेळवण्यात आला. सामन्याआधी भारताच्या प्रमुख दोन खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे भारतीय संघात बदल करण्यात आले. काळ सरावादरम्यान हाताला दुखापत झाल्यामुळे मुंबईकर अजिंक्य राहणेला या सामन्यात मुकावे लागले तर मोहम्मद शमीही पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्यालाही आराम देण्यात आला. रहाणेच्या जागी के. एल. राहुल तर शमीच्या ऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी मिळाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असल्याने कुकने हा निर्णय घेतला असावा. इंग्लंड संघालाही दुखापतीने घेरले असताना जखमी हमीदच्या जागी नवख्या जेनिंग्स याला संधी दिली तर ब्रॉडच्या जागी बॉलची वर्णी लागली. जेनिंग्स व कुकने डावाची दमदार सुरुवात करीत संघाला भक्कम भागीदारी करून दिली. सामान्यांच्या चौथ्या षटकात करून नायरने उमेश यादवच्या गोलंदाजीवर गलीमध्ये जेनिंग्सचा झेल सोडून एक मोठे जीवदान दिले. लगेच सातव्या षटकात पंचांनी पायचीतची अपील नाकारली असता कर्णधार विराट कोहलीने रिव्हिव्यू घेतला परंतु तिसऱ्या पंचानी हा निर्णय नाकारला. मिळालेल्या जीवदानाला फायदा घेत जेनिंग्सने आपले अर्धशतक झळकावले आणि संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. भारताला पहिला बळी जडेजाने २६ व्या षटकात मिळवून देत कर्णधार कुकला ४६ धावांवर माघारी धाडले. भारताला पहिला बळी मिळवण्यास तब्बल ९९ धाव मोजाव्या लागल्या. चहापानापर्यंत १ गड्याच्या मोबदल्यात इंग्लंडने ११७ धावा केल्या. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या खेळाडूंना दबावात टाकण्याचा प्रयत्न केला. ३७ व्या षटकात यष्टीरक्षक पार्थिव पटेलने जडेजाच्या गोलंदाजीवर एक सोपी यष्टिरक्षणाची संधी सोडली. थोडासा वेगवान असा चेंडू पटेलला बरोबर पकडता न आल्यामुळे रूटला एक जीवदान मिळाले. परंतु या जीवदानावर अश्विनने पुढच्याच षटकात विरजण लावत रूटलाल माघारी धाडले आणि पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. एकीकडे सलामी फलंदाज जेनिंग्सने आपली संयमी फलंदाजी चालू ठेवत धावफलक चालतं ठेवलं. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मोईन अलीने जेनिंग्ससोबत चिकाटी फलंदाजी केली. यंदाच्या काऊंटी सत्रात खोऱ्याने धावा उपासणाऱ्या जेनींग्जसने आपल्यावर दिलेली जबाबदारी योग्य रीतीने हाताळत पदार्पणातच दमदार शतक ठोकलं. अशी किमया करणारा तो १९ वा इंग्लिश खेळाडू ठरला. तसेच २००० नंतर ज्या ५ खेळाडूंनी इंग्लंड साठी पदार्पणात शतक ठोकलं  आहे त्यात तो चौथा दक्षिण आफ्रिकेत जन्मणारा इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे. चहापानापर्यंत इंग्लंडने २ गड्यांच्या मोबदल्यात १९६ धावा  होत्या. खेळपट्टीवर आपली नजर जमून बसलेल्या जेनिंग्सने मोईन अलीच्या साथीने इंग्लंडला ३ च्या  जमून दिल्या. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मोईन अलीने आपले अर्धशतक झळकावलं. अलीचे अर्धशतक होताच अश्विनने ७१ व्या षटकात त्याला करूण नायर करावी झेलबाद करीत तंबूचा रस्ता दाखवला. लगेचच अश्विनने शतकवीर जेनिंग्सचाही अडथळा दुर करीत पाहुण्यांना अडचणीत आणले. जेनिंग्सने २१९ चेंडूंचा सामना करीत १२ चौकारांच्या साहाय्याने ११२ धाव जमवल्या. दोन पाठोपाठ धक्के मिळाल्यानंतर इंग्लंडने पुढील १० षटके संयमी फलंदाजी केली. ८१ व्या षटकात पुन्हा अश्विनने आपल्या फिरकीची जादू दाखवत बैस्टोला उमेश यादवकरावी झेलबाद करीत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. सामना संपण्यास काहीच षटके असताना इंग्लंडने संयमी फलंदाजी करीत विकेट न गमावता दिवसभराच्या खेळात षटकांत ५ गडी गमावत २८८ धाव जमवल्या. भारतातर्फे अश्विनने ७५ धावांत ४ तर जडेजाने ६० धावांत १ गडी बाद केला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *