भारत वि. श्रीलंका: विराटच्या दमदार द्विशतकाने श्रीलंका अडचणीत

दिल्ली: दिशाहीन गोलंदाजी आणि प्रमुख खेळाडूंच्या उपस्थित भारताच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाला ‘विराट’ खेळीने आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चांगलेच धुतले. आजचा दिवस गाजला तो आणखी एका कारणाने. ते म्हणजे श्रीलंका संघाच्या रडीच्या डावामुळे. कालच्या दमदार खेळीने पहिल्याच दिवशी सामन्यावर आपली पकड जमवलेल्या भारतीय फलंदाजांनी आजही चांगली खेळी केली. काळ दीड शतक झळकावून नाबाद असलेल्या विराट कोहलीने आज आपल्या घराच्या मैदानावर उपस्थित प्रेक्षक वर्गाला चांगलीच पर्वणी दिली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक, दुसऱ्या सामन्यात द्विशतक आणि या सामन्यातही आणखी एक द्विशतक झळकावत एका नव्या विक्रमला गवसणी घातली. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जिकडे कर्णधार म्हणून एकही कर्णधाराला एकपेक्षा अधिक द्विशतक झलकावता आलेलं नाही तिकडे एकट्या विराट कोहलीने एक-दोन नव्हे तर तब्बल सहा द्विशतके झालकावत एक आगळा-वेगळाच विक्रम नोंदवला. कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके लगावण्याच्या शर्यतीतही त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराला (५) मागे टाकत याही यादीत अग्रस्थानी झेप घेतली. तसेच विनोद कांबळी नंतर सलग दोन द्विशतके ठोकणारा तो दुसरा भारतीय फलंदाज व सहावा एकंदरीत फलंदाज ठरला. तत्पूर्वी, द्विशतकानंतर हतबल झालेल्या श्रीलंका संघाने पुन्हा एकदा आपला रडीचा डाव सुरु केला. विराट कोहली त्रिशतकाकडे आगेकूच करत असताना श्रीलंकन संघाने उपहाराच्या सत्रानंतर प्रदूषणाचे कारण दाखवत खेळ थांबवला. याचाच परिणाम, कोहली चांगला सेट झालेला दिसताना या विनाकारणच्या व्यत्ययामुळे त्याची एकाग्रता भंगली आणि तो २४३ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतरही श्रीलंकेचे खेळाडू क्षेत्ररक्षण करताना चालढकल करू लागले आणि परिणामी कोहलीने भारताचा डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला. मजेशीर बाद म्हणजे फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या एकही श्रीलंकन खेळाडूला दिल्लीच्या प्रदूषणाचा त्रास जाणवला नाही. भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलेच रडवले. मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर करुणारत्नेला सहाकरवी झेलबाद करीत पाहुण्यांना पहिला धक्का दिला. दिवसाअखेरीस श्रीलंकेने ३ बाद १३१ धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावातील धावसंखेच्या अजूनही ते ४०५ धावांनी मागे आहेत.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *