मुलगी जरी मी

नको नको गं आई, असे करु आघात इतरांसारखं मलाही, येऊ दे गं या जगात | नको जगात येण्यापूर्वीच मला अशी मारू नको मुलगी म्हणून, माझा राग राग करु | मी मुलगी झाले यात, सांग काय माझा दोष का गं धरीलास असा, माझ्यावरती रोष | नको असे जन्मापूर्वीच घालू माझ्यावर घाव मलाही बघायचे सुंदर जग आणि माझे गाव | खेळायचे तुझ्याशी मजला, निजायचे तुझ्या कुशीत बसायचे तुझ्यापाशी, मला अगदी खुशीत | मी मुलगी झाले यात, काय अपराध केला नको निष्ठूर होऊन, असे संपवूस मला | नको मुलगी म्हणून मारूस, मी मुलासारखेच सुख देईन नाही एकटी पडणार तू, मी तुझी काळजी घेईन | तुझा माझ्यावरचा राग मला आतल्या आत कळतो गं तुझ्या चिडण्या रडण्याने जीव हा तळमळतो गं | तुझ्या हाताचा स्पर्श, आई एकदा तरी लाभू दे इतरांसारखे खुशीत, आई मलाही जगू दे | (कवयित्री:- कु. प्रांजला मयुरेश धडफळे, पुणे.) संपर्क:- ९६७३१६७०९९]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *