गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार

ठाणे– गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण, असे समीकरण जुळवून गणेशमूर्तींच्या परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. या दान केलेल्या मुर्ती पुन:विसर्जन करतांना मुर्तीची विटंबना झाल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. मृत मानवाचे अंत्यसंस्कारही सन्मानाने केले जातात; येथे मात्र श्री गणेशाला देव म्हणून पुजूनही या गणेशमूर्ती घाणेरड्या खाणी, पडक्या विहीरी वा खड्डे यांमध्ये किंवा निर्जनस्थळी टाकल्या गेल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार त्या मूर्ती कचरा भरण्याच्या गाडीतून वाहून नेल्या जातात. त्यामुळे गणेशमूर्तींची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अशाप्रकारे मुर्तीची विटंबना करणारयांवर कठोर कारवाई करावी आणि कृत्रिम तलावात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात यावी यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अधिवक्ता चेतन बारस्कर, हिंदु महासभेचे अधिवक्ता जयेश तिखे आणि सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत हे उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन आणि ढोंगी पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणारया गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात. शासनाकडून माहितीच्या अधिकारात गोळा केलेल्या कागदपत्रांनुसार प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वर्षभर प्रदूषण आणि पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. १५ फेब्रुवारी २०१४ च्या वॉटर क्वालिटी स्टेटस् ऑफ महाराष्ट्रच्या पाण्याच्या गुणवत्ता दर्जा विषयक अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन एकूण ६,२१०.३ दशलक्ष लिटरपैकी २,५७१.७ दशलक्ष लिटर म्हणजे २ अब्ज,५७ कोटी, १७ लाख लिटर एवढे सांडपाणी (अतीदूषित पाणी) कुठलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसेच नद्या, तलाव आदी जलक्षेत्रांमध्ये सोडले जात आहे. प्रतिदिन इतक्या मोठ्या प्रमाणात होणार्या प्रदूषणाविषयी तोंड बंद ठेवणारे गणेशोत्सवाच्या वेळी कसे प्रदूषण होते, याची ओरड सुरू करतात ! शाडूमातीची मूर्ती आणि नैसर्गिक रंग यांचा पर्याय देण्याऐवजी मूर्तीदान आणि कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास सांगून पुढे त्या मूर्ती कचरा म्हणून टाकून देतात आणि गणेशभक्तांचा विश्वासघात करतात; याबद्दल मूर्तींची विटंबना करणारयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने (नॅशनल ग्रीन ट्र्रिब्यूनलने) ९ मे २०१३ या दिवशी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नसल्याचे स्पष्ट करत गुजरात राज्यशासाद्वारे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर आणलेली बंदी उठवली आहे. याची कृपया कटाक्षाने नोंद घ्यावी. याशिवाय राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने गणेशमूर्तीची उंची आणि नैसर्गिक रंग याबाबत शासनाने पाऊले उचलावीत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मूर्तीदान आणि तिचे कृत्रिम तलावात विसर्जन या कृती बंद कराव्यात. धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे समुद्र, नदी वा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी आम्ही करत आहोत. माहितीच्या अधिकारात गोळा केलेल्या कागदपत्रांसाठी या लिंकवर जावे : http://www.hindujagruti.org/hinduism/ganesh-festival/rti-docs आपला विश्वासू, श्री. विश्वनाथ कुलकर्णी हिंदु जनजागृती समिती (संपर्क : ९३२४८६८९०६)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *