इचलकरंजी येथे मानवाधिकार व भ्रष्टाचार नियंत्रण कृती समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ संपन्न

कोल्हापूर :- नुकतेच इचलकरंजी (कोल्हापूर) येथे मानवाधिकार व भ्रष्टाचार नियंत्रण कृती समितीच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. सदर शुभारंभ प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री. विजयराव कुराडे, महाराष्ट्र अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. अरुण पाटील, तसेच इचलकरंजी शहर अध्यक्ष श्री. सौरभ कुरणे आणि सौ. रिना कांबळे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री. विजयराव कुराडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी भाषणात संघटनेच्या वतीने जनतेला न्याय देण्याबाबत उपस्थित जनसमुदायास त्यांनी योग्य असे मार्गदर्शन केले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *