आसामच्या हिंदूंनो सावधान

हिंदुराष्ट्रपती स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताच्या प्रत्येक प्रांतात हिंदूंची स्थिती कशी आहे, त्यांच्यापुढे काय अडचणी आहेत याचा सतत विचार करीत असत. त्यामुळे तिकडे दूर आसाममध्ये हिंदूंवर येणाऱ्या संकतांकडेही त्यांचे लक्ष होते. रत्नागिरीसारख्या लहानशा ठिकाणी स्थानबद्ध असतांना सुद्धा त्यांनी आसामकडे लक्ष दिले होते आणि तेथील हिंदूंना ख्रिश्चन मिशनरी कारवायांपासून सावध रहाण्याची चेतावणी दिली होती. त्याचप्रमाणे १९४१ च्या जुलैच्या दि. १३ ला त्यांनी एक विस्तृत पत्रक काढून आसामच्या हिंदूना चेतावणी दिली की आसामचे पाकिस्तान करण्याच्या मुसलमानी कारवाया चालू आहेत तरी तेथील हिंदूनी सावध रहावे! पूर्व बंगाल पापस्थानात गेला पण त्यापलीकडील आसाम फाळणीचे वेळी भारतात राहिला याचे थोडेसे तरी श्रेय सावरकरांनी तेथील हिंदुमध्ये केलेल्या जागृतीला दिले पाहिजे. तेथील हिंदूही इतर प्रांतातील हिंदूप्रमाणे हिंदू-मुस्लिम एकीच्या धुंदीत असावध राहते तर आसामचे पापस्थान होणे अपरिहार्य होते. ते होऊ नये यासाठी जुलै १९४१ मध्ये सावरकरांनी दिलेली सूचना अशी :

       आसामी हिंदूवरील भावी संकट
     आसाम मुसलमान बनविण्याचा डाव 

“हिंदुस्थानातील सर्व हिंदु समाज आणि विशेषतः आसाम मधील हिंदू जनता यांचे एका भयानक अरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्यांक प्रांताचे रूप देऊन तेथे हिंदूचे जिणे अशक्य करून सोडण्याची कारवाई चालू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंगाल नि इतर प्रांत यांमधील मुसलमान आसामात आणून त्यांची तेथे वस्ती करून आसामातील मुसलमानांची संख्या वाढविण्याची पद्धतशीर प्रयत्न चालू असून, त्याला बरेच यशही आले आहे. त्यासाठी आसाम विधिमंडळाने भूविकास निर्बंध संमत केला आहे. बाहेरच्या प्रांतांतून आसामात घुसणारी मुसलमानांची टोळधाड थांबविण्यासाठी हिंदु महासभेने सतत विरोध चालविला असतानाही, त्यावेळी अधिकारावर असलेल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने हे आसामचे मुसलमानीकरण थांबविण्यास नकार दिला. हिंदू मतदारांनी निवडून दिलेल्या या हिंदू मंत्र्यांनी नवागत मुसलमानांच्या बरोबरीने न वागता हिंदूना अधिकार देण्याचेही नाकारले ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. अनेक ठिकाणी मुसलमानांकडून नव्याने आलेल्या हिंदूवर संघटीतपणे आक्रमण होत होते, तथापि काँग्रेस मंत्रिमंडळाने इस्लामी अनर्थात सापडलेल्या हिंदूच्या जीविताला आणि वित्तालाही संरक्षण देण्याची काळजी बाळगली नाही याहीपुढे जाऊन पुरोगामी गटाच्या काँग्रेसवाल्यांनी एक नामधारी ‘मिश्र मंत्रिमंडळ’ स्थापून त्या मंडळांत आसाममधील मुस्लीम लीगचा पुढारी प्रधानमंत्र्यांच्या अधिकारावर स्थापन केला. आसाममध्ये पाकिस्तानी मुस्लीम राज्य स्थापन करण्याचे लीगचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी याच मंत्रिमंडळाने हातभार लावलेला आहे.

सिंधपासून काश्मीरपर्यंत हिंदुस्थानची पश्चिम नि वायव्य सीमा यापूर्वीच मुस्लीम बहुसंख्याक बनवून टाकण्यात आली आहे, आणि तेच संकट पूर्वबंगाल नि आसाम यावर कोसळू पाहात आहे, ते अरिष्ट आपण टाळू शकलो नाही, तर हिंदुविश्वाच्या स्वातंत्र्याला, स्थैर्याला नि अधिसत्तेला तो एक नित्याचा धोका होऊन बसेल हे निश्चित!

तथापि आसाममधील हिंदूची आजची लोकसंख्या हिंदुस्थानातील अखिल हिंदू समाजाच्या पाठिंब्याने एकत्रित झाली आणि तिने भूविकास योजनेला कसून नि दृढनिश्चयाने विरोध करण्याचे ठरविले, तर अजूनही हे संकट टाळता येईल, अद्यापि वेळ गेलेली नाही.

आसाममधील पराक्रमी, राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ पूर्वजांचे आजचे वंशज जर मनात आणतील तर ही हिंदुभक्षक लाट ते हा हा म्हणता परतवू शकतील. भूविकास योजनेची हिंदू-विरोधक कार्यवाही आणि प्रत्यक्ष त्या योजनेचा निर्बंध याविरुद्ध सारे रान आसामी हिंदूंनी उठवून दिले पाहिजे. आपण आपल्या तेजस्वी इतिहासाचा साक्षी असलेला हा हिंदूचा आसाम मुसलमान होऊ देणार नाही काय ? नाही ! नाही !! असे कदापि घडू देता कामा नये. त्यासाठी खालील तीन गोष्टी मात्र तत्काळ घडविल्या पाहिजेत.
१) प्रथमतः आसामी हिंदूनी परधार्जिण्या काँग्रेसच्या मानसिक दास्यत्वातून तत्काळ मुक्तता करून घेतली पाहिजे. आसाममधील मुसलमान वसाहतवाल्यांकडून होणान्या आक्रमणापासून हिंदूंचे रक्षण करण्याच्या कार्यात काँग्रेसचे काही पुढारी नि पुरोगामी गट दोन्हीही निरुपयोगीच ठरलेले आहेत. परंतु त्यांनी अवश्य लक्षात ठेवावे की मुसलमानमय झालेल्या आसामाचा भस्मासुर केव्हा तरी त्यांच्याही डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही. यास्तव आसाममधील हिंदूवर त्यांच्या भावी अल्पसंख्यांकत्वामुळे उद्या निश्चितपणे कोसळू पाहणा-या आपत्तीपासून त्याचे रक्षण व्हावयाचे असेल, तर तत्रस्थ हिंदूनी आताच याक्षणी काँग्रेसच्या ध्येयधोरणांतील तथाकथित राष्ट्रीयत्वाच्या शापांतून आपली मुक्तता करून घ्यावी.
२) दुसरे म्हणजे आसामातील हिंदूनी महासभेच्या ध्वजाखाली एकत्र होणे अत्यावश्यक आहे. कारण आता हे सा-यांनाच माहीत आहे की, अखिल हिंदुस्थानातील इतर सर्व संस्थांपैकी हिंदुमहासभा ही एकच अशी संस्था आहे की जिने या समीपच्या भविष्यात आसामाचा घास करू पाहणा-या घोर संकटाची पावले ओळखली आणि त्याला विरोध आरंभिला हेही तितकेच सत्य आहे की, आसाममधील हिंदुची गा-हाणी वेशीवर टांगून त्यांच्या हितरक्षणार्थ अवघ्या भारतातील हिंदुजगताचा सक्रीय आधार याच महासभेने त्यांना मिळवून दिला. आणि तसे पाहिले तर आसाममध्ये आजही हिंदूचीच बहुसंख्या आहे, त्यांनी आता विधिमंडळाच्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसवाल्या इच्छुकाला कधीही एकही मत टाकणार नाही, तर अलट ते मत सुस्पष्टपणे हिंदुसंघटनेच्या दर्शिकेवर उभ्या राहिलेल्या केवळ हिंदुहितदर्शी इच्छुकालाच देईन अशी दृढ प्रतिज्ञा करावयास पाहिजे. अशाने आसाममधील हिंदू आसाममध्ये अप्रत्यक्षतः हिंदुसंघटनवाल्यामंत्र्याचे मंत्रिमंडळ बनवून असे सरकार अत्पन्न करतील की जे उघडपणे नि निश्चितपणे आसामी हिंदूच्या हिताची दक्षता घेऊ लागेल. ते हिंदू प्रधानमंडळ, मग या तिरस्करणीय योजनेचे तुकडे तुकडे उडवून हिंदुवसाहतवाल्यांना वैध रक्षण देईल नि त्यांच्या सुखसोयी पाहील. तसेच आसामाच्या आसमंतातील डोंगरी हिंदू टोळ्यांना, आज वस्ती नसलेल्या प्रदेशात वसाहती स्थापून तो प्रदेश व्यापून टाकण्यासाठी साहाय्य करील आणि वस्तुतः अशा ‘अॅबॉरिजिनल’ म्हणून ओळखल्या जाणा-या (पण वस्तुतः खऱ्या) हिंदूच्याचकरिता या पडीत जागा राखून ठेवल्या गेल्या पाहिजेत.
३) आणि तिसरी महत्वाची गोष्ट ही की, आसाम प्रांतिक हिंदुसभेची संघटना शक्य तितक्या त्वरेने एकदा घडविल्यानंतर सभेच्या हिंदू पुढाऱ्यांनी अशी एक योजना आखून ती व्यवहारावी की, जेणेकरून आसाममधील व आसपासच्या हिंदू डोंगरी टोळ्या आणि बुद्धिमान नि उद्योगी हिंदू शेतक-यांना ते एक विलोभन वाटावे. आसाममधील जे भूप्रदेश वसाहतीसाठी मोकळे करण्यात आले आहेत त्यात घुसून तेथे स्थायिक होण्याचा मोह वरील दोघांना जेणेकरून अनावर होईल अशीच ती योजना नि तिची कार्यवाही असावयास पाहिजे.
अर्थात चालू परिस्थितीत असे कोणीही म्हणत नाही की, अहिंदुवर असमर्थनीय अशा प्रकारची बंदी घालून त्यांना अजिबात वगळावेच. आपण आता जर काही मागू शकत असू तर जेवढेच की, इतरांच्या बरोबरीने हिंदूनाही समान संरक्षण, समान संधी नि समान सोयी दिल्या गेल्या पाहिजेत. तथापि इतके झाले, तरी त्यापुढचे खरे काम म्हणजे दुसरा कोणी प्रतिस्पर्धा येथून त्याने तेथे आपले बस्तान बसविण्याआधी हिंदूंनी तेथे प्रवेश करून आपले ठाण मांडले पाहिजे आणि ते कार्य यशस्वी करण्याचे दायित्व सर्वस्वी आसामी हिंदूच्या तातडीच्या नि संघटित सिद्धतेवरच पडते. हिंदूंनी इतर अनेक दुर्घटनांवरून आता जेवढा तरी धडा घ्यावा की, रडून कुंथून काही कधी कोठे संकट निवारण होत नसते. आगामी आपत्तीशी यशस्वी रीतीने टक्कर द्यावयाची असेल, तर एकच मार्ग प्रतिपक्षाच्या कारस्थानी तसेच प्रभावी कारस्थान उभे करणे ; तशी आपली समर्थ संघटना आसामी हिंदूंनी घडविली पाहिजे. शत्रूच्या शस्त्रानीच त्यांच्याशी लढून विजय संपादण्याची शक्ती उत्पन्न केली पाहिजे. “धटासि पाहिजे धट उद्भटासि पाहिजे उद्धट । खटनटासी
खटनट। अगत्य करी।”लक्षात ठेवा याविना तरणोपाय नाही।
आसाममधील हिंदूनी वर सांगितलेले हे धोरण साऱ्या हिंदुस्थानातील हिंदुसंघटकाच्या पाठिंब्याने प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबर कसली तर यश दूर नाही. वरील कार्यक्रम आचरणांत आणण्यास जसा अवघड नाही तशीच त्याच्या यशस्वीतेचीही खात्री देता येते आणि एकदा आमचे आसामी हिंदू असे दृढपणाने संघटित होऊन संग्रामार्थ उभे ठाकले म्हणजे आसाम इस्लाम होण्याच्या संकटातून वाचेल. इतकेच नव्हे, तर तेथील हिंदू बहुसंख्य वेगाने शक्तिवान् नि वर्धमान होत गेलेला दिसेल.”
सावरकरांच्या ह्या पत्रकानंतर आसाम हिंदुसभेचे नेते आणि केंद्रीय विधीसमितीचे सदस्य श्री. अनंग दाम यांनी एका पत्रकात म्हटले की, “ह्या १९४१ च्या शिरगणतीचे आकडे मोठे चमत्कारिक आहेत. १९३१ मध्ये आसामात हिंदूची लोकसंख्या ५२,०४,६५० होती ती आता ४५,४०,४९७ झाली आहे तर १९३१ मध्ये आसामात मुसलमानांची लोकसंख्या २७,८०,५१४ होती ती आता ३४,७४,१४१ झाली आहे !! तर वन्य जातीची लोकसंख्या ९,१२,३९० वरून १८,३२,१९६ वर गेली आहे. अशा ह्या संख्येतील भयंकर उलथापालथोमुळे ह्या शिरगणतीत काहीतरी घोटाळा असावा असे हिंदूना वाटत असून त्यांची केंद्र नि राज्यशासनाला
विनंती आहे की आसामची शिरगणती पुन्हा केली जावी ! !
आसामच्या ह्या शिरगणतीच्या कहाणीवरून फेब्रुवारी महिन्यात सावरकरांनी शिरगणतीसंबंधी दिलेली पूर्वसूचना आणि हे निर्णय बाहेर येताच त्यांनी आसामच्या हिंदूना दिलेली चेतावणी कशी योग्य होती हे आता पटेल !

संदर्भ- अखंड हिंदुस्थान लढा पर्व, पृष्ठ- १३२-१३५, बाळराव सावरकर

©सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *