घाटकोपर येथे हिंदु धर्मजागृती सभेमध्ये हिंदु एकतेचा अविष्कार

हे वर्ष अटक झालेल्या निरपराध हिंदूंच्या सुटकेचे असेल ! अधिवक्ता संजीव पुनाळेकर (राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद) घाटकोपर, १६ जानेवारी – हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून गुन्हे दाखल झालेल्या हिंदूंना न्यायिक सहकार्य केले जात आहे. प.पू. आसारामबापू, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड सुटतील असा विश्‍वास आम्हाला आहे. हे वर्ष अटक झालेल्या निरपराध हिंदूंच्या सुटकेचे असेल, असा विश्‍वास हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घाटकोपरमधील बाबू गेनू मैदान येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. १५ जानेवारीला पार पडलेल्या या हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके उपस्थित होते. या सभेला स्थानिक नगरसेवक श्री. संजय भालेराव, शिवसेनेचे उपविभागप्रमुख सर्वश्री सुभाष पवार, सुरेश पाटील, माजी उपविभागप्रमुख श्री. गजानन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. फेसबूकद्वारे १३ हजारहून अधिक लोकांनी या धर्मसभेच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला. [gallery columns="4" link="file" ids="2584,2585"] हिंदू नृहसिंहांनो, जागे होऊन स्वत:चे मूळ स्वरूप जाणून घ्या ! सौ. नयना भगत, प्रवक्त्या सनातन संस्था एकदा स्वामी विवेकानंदांसमोर एका इंग्रज वक्त्याने भारतीयांना हीन संबोधले. तेव्हा स्वामीजींनी सर्वांसमोर त्याच्या थोबाडीत लगावली आणि म्हणाले की, भारतीय कुत्रे नाहीत, तर सिंह आहेत. आज हिंदूंची अवस्था शेळ्यांच्या कळपात चुकून गेलेल्या सिंहाच्या छाव्याप्रमाणे झाली आहे. शेळ्यांच्या कळपात राहिल्याने छावा शिकार करायचे विसरून गेला आहे. आज या सिंहाला त्याचे मूळ प्रतिबिंब आणि शौर्य दाखवून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदूंनो, हिंदु राष्ट्र् स्थापनेच्या कार्यामध्ये समर्पित व्हा ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी दिल्यावर क्रांतीकारक बाबू गेनू याने यापुढे प्रत्येक श्‍वास देशाला स्वतंत्र करण्यासाठी समर्पित करीन, असा दृढनिश्‍चय केला. त्यांचे नाव असलेल्या मैदानात ही सभा घेतांना हिंदूंनीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा दृढनिश्‍चय करायला हवा. आज सहिष्णु असल्यामुळेच हिंदूंची श्रद्धा आज सर्रास पायदळी तुडवली जाते. शासनाच्या कह्यात असलेल्या बहुसंख्य मंदिरांचे घोटाळे आज उघड होतांना दिसत आहेत. शालेय अभ्यासक्रमात हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास शिकवला जात नसल्याने हिंदूंमध्ये पराभूत मानसिकता निर्माण होत चालली आहे. तरुणांनी हिंदूंच्या पराक्रमी विजयाचा आदर्श घेऊन हिंदू राष्ट्र स्थापनेच्या निस्सीम ध्येयासाठी तन, मन, धन समर्पित करून सहभागी होण्याची आज वेळ आली आहे. सामाजिक, मानसिक आणि धार्मिक समस्या यांवर संघटन, संघर्ष आणि साधना हेच पर्याय असून सर्वांनी ईश्‍वर संकल्पित हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये सिंहवाटा घेऊन समर्पित होऊया. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना समजून घेण्यासाठी गडकोट मोहिमेवर गेले पाहिजे – श्री. अशोक शिंदे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी असंख्य मावळ्यांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. हिंदूंमधील तेज लोप पावत चालल्यामुळे आजमितीला असे मावळे सिद्ध होत नाहीत. अशी सिद्धता होण्यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज विद्यापिठात गेले पाहिजे. ही विद्यापिठे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी जवळून अनुभवले असे गडकोट आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्ही सन्मान करतो”, केवळ असे म्हणून चालणार नाही, तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे गुण रक्तात उतरले पाहिजे. हिंदवी स्वराज्यासाठी त्याग, निष्ठा स्वत:मध्ये निर्माण करायची असेल, तर गडकोटांवर जायलाच हवे. १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड पावन खिंडीमार्गे गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली असून यामध्ये हिंदूंनी बहुसंख्येने सहभागी व्हावे. आपला नम्र, डॉ. उदय धुरी, मुंबई प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती संपर्क क्र. ८४५०९५०५०२ (बातमी संकलन:- श्री. जगनराव घाणेकर)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *