वाशी व ठाणे येथे हिंदुत्ववादी संघटनांची संतप्त निदर्शने

भारतात आतंकवाद पसरवणार्‍या शत्रूराष्ट्र पाकिस्तान समवेतचा दिल्ली येथे होणारा ‘शान-ए-पाकिस्तान’ हा कार्यक्रम रहित करा

मुंबई– भारतातील आतंकवादात सातत्याने पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झालेला आहे. तसेच भारतातील फुटीरतावाद्यांनाही पाकिस्तान सहकार्य करत आहे. या फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याच्या आग्रहामुळे नुकतीच भारत सरकारने कडक भूमिका घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद रहित केली; मग पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बोलावून आणि त्यांच्या कव्वाल्या ऐकून पाकिस्तानचे शेपूट सरळ होणार आहे का ? जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद आणि काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना सहकार्य करणे बंद करत नाही; तोपर्यंत पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध बंद करायला हवेत. या दृष्टीने भारत सरकारने वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत १० ते १२ सप्टेंबर या काळात दिल्ली येथे आयोजित केलेले ‘शान-ए-पाकिस्तान’ हे प्रदर्शन आणि ‘एक शाम पाकिस्तान के नाम’ ही कव्वाली रद्द करून पाकिस्तानला भारताची कठोर भूमिका लक्षात आणून द्यावी. या मागणीसाठी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’च्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान, स्वाभिमान प्रतिष्ठान, राजश्री शिवबा प्रचारक मंडळ, अखिल नवी मुंबई हिंदू महासंघ, योग वेदांत समिती, बजरंग दल, हिंदु महासभा, शिवसेना, सनातन संस्था आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने वाशी व ठाणे (प.) रेल्वे स्थानकाबाहेर संतप्त निदर्शने करण्यात आली. या वेळी मोठया संख्येने धर्माभिमानी आणि राष्ट्रप्रेमी हातात फलक घेऊन घोषणा देत उपस्थित होते. भारत निर्यात महासंघ (FIEO) आणि बराती पाकिस्तान (कराची वाणिज्य महासंघाचे सदस्य) यांनी संयुक्त विद्यमाने देहली येथे शान-ए-पाकिस्तान या नावे ११ ते १२ सप्टेंबर या काळात आधुनिक वस्त्रप्रावरणांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केली आहे, तसेच १० सप्टेंबर रोजी एक शाम पाकिस्तान के नाम ही कव्वाली ठेवली आहे. एकीकडे आतंकवादी हाफीज सईदच्या मागणीवरून भारतातील पँâटम सिनेमावर पाकिस्तानात बंदी घातली जाते, दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या आश्रयाला असल्याचा खुलासा होतो, तर या कव्वालीच्या आणि वस्त्रांच्या प्रदर्शनाच्या द्वारे भारतात पाकड्यांचे उदात्तीकरण का सुरू आहे ? भारत सरकारने पाकिस्तानला सरळ करण्यासाठी क्रिकेट सारखे खेळ असो किंवा कलाकारांद्वारे मनोरंजन, दोन्हींवर बंदी घालून पाकिस्तानला धडा शिकवावा. त्यामुळे शान-ए-पाकिस्तान नावाचा कार्यक्रम रहित करून भारतीय जवानांच्या बलिदानाचा सन्मान राखावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. — डॉ. उदय धुरी, राष्ट्रीय हिंदू आंदोलन (संपर्क : ८४५०९ ५०५०२) ]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *