हिंदू महासभेच्या वतीने पंढरपूर येथे शस्त्र पूजन

  • पंढरपूर :- पंढरपूर येथे विजया दशमी दसरा  हिंदुमहासभेच्या वतीने भव्य प्रमाणावर साजरा करण्यात आला. सिमोल्लंघन गणेशाजवळ शस्त्र पुजन मांडव उभा केला होता. या मंडपामध्ये शस्त्रे ठेवून त्याचे पुजन प्रत्येक हिंदुंना करता यावे यासाठीचे नियोजन करण्यात आले होते. या शस्त्रांमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.  या मंडपामध्ये प्रथम शस्रपुजनाचा मान रा. स्व. संघाचे महाराष्ट्र मंडळाचे सदस्य डॉ. सचिन लादे यांना देण्यात आला . यानंतर शस्त्र पुजन सर्वांसाठी खुले करण्यात आले. सदर कार्यक्रम रात्रौ दहा वाजेपर्यंत सुरु होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय कुलकर्णी, विवेक बेणारे, विकास मोरेकाका, बाळासो डिंगरे, प्रशांत खंडागळे, पवन बेणारे ,यांनी परिश्रम केले.
Attachments area
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *