आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताह

जळगाव(सागर कुलकर्णी) दि १० संपुर्ण महाराष्ट्रामध्ये विज ग्राहक आणि विज कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण व्हावी व ग्राहकांना अपघात विरहित विज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या विद्युत निरीक्षक, जळगाव कार्यालयामार्फत दि.११ ते १७ या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत, विद्युत अपघात होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व सावधानता याबाबत उदबोधन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी निबंध, कविता, घोष वाक्य इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार, असून शाळांमध्ये विद्युत सुरक्षिततेबाबत माहिती देणारी ध्वनी चित्रफित दाखविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात, बस स्थानकात तसेच बसेसमध्ये जनजागृतीसाठी विद्युत सुरक्षेविषयीचे पोस्टर लावून जास्तीत जास्त जनतेपर्यंत विद्युत सुरक्षेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत जळगाव जिल्हामध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे….. कार्यक्रमाचा तपशील दि. ११ – विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन मा. उर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच हस्ते औरंगाबाद येथे सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. दि. १२ जळगाव येथील शिवतीर्थ मैदान, जी.एस.ग्राऊंड येथे मा. आयुक्त महानगरपालिका जळगाव यांच्या हस्ते विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या स्टॉलचे उदघाटन सकाळी ११ वाजता तसेच जळगाव शहरातील शाळेमध्ये विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन व चलचित्रफित दाखविणे, दि. १३ जामनेर शहरातील विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन तसेच शाळेत विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन व चलचित्रफित दाखविणे, दि. १४ जळगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील जनजागृतीपर पोस्टर लावणे तसेच दिपनगर येथील औष्णिक विज निमिर्ती केंद्रात विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन. दि. १५ जळगाव शहरातील ‘डी-मार्ट’ येथे विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती स्टॉल लावण्यात येणार आहे. दि. १६ चाळीसगाव शहरात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती स्टॉल लावण्यात येणार आहे. तसेच शहरातील शाळेत विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन व चलचित्रफित दाखविणे. दि. १७ जळगाव बसस्टॅन्ड येथे विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती स्टॉल लावण्यात येणार आहे. विजग्राहकांसाठी लक्षात ठेवण्याजोगे काही ठळक मुद्दे – विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळु नका, घरातल्या वायरींगमध्ये अर्थिग तार उपकरणापर्यत आवश्य पोचवा, घरातील उपकरणे व वायर्स आय.एस.आय. प्रमाणित वापरा, शॉक लागु नये म्हणून इ.एल.सी.बी. तसेच आर.सी.सी.बी.चा वापर करावा. तात्पुरते व लोबकळणाऱ्या वायर्स वापरुन उपकरणे चालु नये, विद्युत उपकरणे अप्रशिक्षित लोकांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करु नये, विजेचे खांब व तणाव तारांना गुरे ढोरे बांधु नयेत. शेतातील कुंपणात विज प्रवाह सोडु नये. तुटून पडलेल्या विज वाहक तारांना हात लावु नये.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *