१३० करोड लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानात सुमारे ८० ते ९० करोड हिंदू लोकसंख्या असून देखील आज हिंदू आपल्याच हिंदुस्थानात अल्पसंख्यांक झाला आहे. येथे हिंदूंच्या अास्थेवर, संस्कृतीवर आणि परंपरांवर घाला घालण्याचे काम येथील न्याय व्यवस्था करताना दिसत आहे. हिंदूंच्या प्रत्येक सणांवर कायद्याचा बडगा दाखविण्यात येत आहे. अनेक ऐतिहासिक मंदिरे सरकार आपल्या ताब्यात घेत आहे. काही हिंदुद्रोही मंडळी हिंदू रिती, परंपरा याच्याशी काडीचाही संबंध नसताना सुप्रीम कोर्टात हिंदू सणांच्या विरोधात याचिका दाखल करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि आपली न्याय व्यवस्था देखील त्यांच्या कट कारस्थानाना बळी पडताना दिसत आहेत.
हिंदू सणांवर कायद्याचा बडगा
हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दीपावली या हिंदूंच्या सणाच्या बाबतीत अटी आणि शर्ती लादून निर्बंध लागू करून हिंदूंच्या आनंदात विरजण टाकण्याचे काम केले आले. आम्ही आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेचा कायम आदरच करतो, परंतु याच न्याय व्यवस्थेमध्ये काही अशी मंडळी ठाण मांडून बसली आहेत, ज्यांच्यामुळे हिंदुस्थानात धार्मिक सलोखा विघडविण्याचे कारस्थान तर रचले जात नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. फक्त हिंदूंच्या प्रत्येक सणांमध्ये खोडा घालण्याचे काम सुरू आहे. दही हंडी, गणेशोत्सव, दीपावली, विविध मंदिरांमध्ये महिला प्रवेश असे अनेक प्रकार सद्या कोर्टाच्या कचाट्यात सापडले आहेत. कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या बाबतीत सरकार देखील तात्काळ कारवाई करते आणि हे विशेषतः केवळ आणि केवळ हिंदूंच्या बाबतीतच घडत आहे हे येथे प्रामुख्याने सांगावेसे वाटते.
सद्या दीपावली मध्ये फटाके कधी वाजवायचे, किती वाजवायचे हा विषय चांगलाच तापला आहे. प्रदूषणाच्या नावाने हे सर्व कट कारस्थान सुरू आहे. या सरकारला इतर धर्मियांच्या धार्मिक स्थलांबद्दल बोलण्याची व कारवाई करण्याची हिम्मत नाही. दिपावलीत वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांनी म्हणे प्रदूषण होते, मग वर्षाच्या बाराही महिने कर्णकर्कश आवाजामध्ये मशिदी मधून देण्यात येत असलेल्या अजानाचा त्रास सर्वसामान्य जनतेने का सोसावा.? का त्याच्या विरोधात सरकार कारवाई करीत नाही.? त्यात देखील मशिदींवरील असंख्ये भोंगे हे बेकायदेशीर असून देखील सरकार त्याच्या विरोधात कारवाई करण्यास का टाळाटाळ करते हा संशोधनाचा विषय आहे. येथे विषय फक्त काही ठराविक धर्माचा नसून सर्व धर्म समभाव मानणाऱ्या तमाम भोंदू राजकारण्यांचा देखील आहे. देशात फक्त सर्व धर्म समभावाचा डींगोरा पिटण्यात येतो, परंतु जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त हिंदूंच्या सणाना लक्ष्य करून हिंदूंच्या संस्कृतिक व धार्मिक अस्मितेवर घाला घातला जात आहे. विशेष म्हणजे ज्या हिंदूंनी भाजपला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचविले ते भाजप सरकार मात्र मग गिळून गप्प बसले आहे. हिंदूंनी अजुन किती काळ भाजपचे गुणगान करायचे हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. हिंदुस्थानात प्रत्येक धर्मियांनी भाईचाऱ्याने वागले पाहिजे. हिंदुद्रोही म्हणून उठसूट हिंदू धर्माच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या मंडळींच्या विरोधात सरकारने आता कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. सर्वच धर्मांचा आदर व्हायला पाहिजे. नाहीतर या हिंदुस्थानची अखंडता, एकता फांग पावल्यास शत्रुराष्ट्र दहशतवादी कारवाया करून देशाची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून देशाचे पुन्हा विभाजन झाले तर नवल नको.
जय हिंद.
अरुण आत्माराम माळी
]]>