प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदू महासभेची दादर येथे चौक सभा

मुंबई: अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने क्रांतिवीर बाबाराव सावरकर चौक, दादर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त चौक सभेचे आयोजन करून हिंदूराष्ट्र ध्वज आणि तिरंगा ध्वजारोहण तसेच संपूर्ण वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास संबोधित करताना हिंदू महासभा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. अनुपजी केणी म्हणाले की, बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमान भारतात कशा प्रकारे घुसखोरी करू पाहतायत आणि त्यांना नागरिकत्व देण्याचे काम काही देशद्रोही करत आहेत, हा देशावरचा घातक हल्ला आहे. लोकसभेत कधी न झालेला विधेयक करून, यांना देशाच्या बाहेर काढले पाहिजे. हा मुद्दा फक्त उत्तर-पूर्व भारतापुरता मर्यादित नसून, संपूर्ण हिंदुस्थानाचा आणि हिंदू समाजाचा आहे. आपण प्रत्येक प्रांतातून/राज्यातून एनआरसी ची (नॅशनल रजिस्टार ऑफ सिटीझनशीप) मागणी केली पाहिजे. त्यामुळे घुसखोरीला आळा बसून आपले नागरिकत्व अबाधित राहील, असे वक्तव्य केले आहे.
सबरीमाला मंदिर प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून हिंदूंची आस्था आणि अनेक वर्षाची परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबरोबर श्रीराम मंदिराचा मुद्दा पण न्यायपालिकेत अडकलेला आहे. ती केस हिंदू महासभा सुरुवातीपासून लढत आहे. पण काही राजकीय लोकांनी स्वतःची पोळी भाजून सत्ता मिळवली. पण श्रीराम मंदिराचा मुद्दा अजूनही तसाच आहे. असे वक्तव्य प्रवक्ता मा. श्री. दिनेशजी भोगले यांनी केले आहे.
हिंदू महासभेच्या मुंबई उपाध्यक्षा तथा कीर्तनकार मा. सौ. क्रांतीगीता महाबळ यांनी संपूर्ण वंदे मातरम् गीत आपल्या सुमधुर आवाजात गायिले. तसेच त्यांनी संविधान जे लोक मानत नाहीत, त्यांना संविधानाने दिलेले अधिकार मिळता कामा नये आणि भारतीय नागरिकत्वाचा अधिकार राहता कामा नये असे देखील आपल्या भाषणात उच्चार केला. जो संविधानाचा आणि राष्ट्रीय गीतांचा अपमान करेल, त्यांचा आपण विरोध किंवा आंदोलन करून निषेध केला पाहिजे. पण तसं समाजातून होत नाही. संविधानाचा, राष्ट्रीय गीतांचा आणि राष्ट्रीय चिन्हांचा आदर केला पाहिजे. लोकशाहीसाठी समान नागरी कायदा झालाच पाहिजे, अशी मागणी गेले अनेक वर्षांपासून हिंदू महासभा करत आहे.
चौक सभेला वरिष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उपस्थित होता.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *