गणेशमूर्तींच्या विसर्जनाने प्रदूषण होते अशी ओरड करणाऱ्यांनो, सांडपाण्याद्वारे होणाऱ्या भीषण जलप्रदूषणाचा विचार करा

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर गणेशोत्सव जवळ आला आहे. आता नेहमीप्रमाणे स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते सक्रीय होतील. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली होती. धर्मशिक्षणाचा अभाव आणि कथित पुढारलेपण यांमुळे अनेक जण त्यांच्या नादालाही लागले; पण आता हे स्वयंघोषित समाजसुधारक आणि समाजसेवक यांचे पितळ उघडे पडत आहे. गणपतीच्या मूर्तीला लावण्यात येणाऱ्या रंगांमुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा मूर्ती तलाव, नद्या, खाड्या, समुद्र यांत विसर्जित न करता, कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याची किंवा त्या स्वयंघोषित संघटनांना दान देण्याची फॅशन चालू झाली. प्रत्यक्षात मात्र अशा मूर्तींचे पुढे काय होते, हे जाणण्याचा प्रयत्न कोणी करते का ? कि हिंदु समाज आता गणेशोत्सवच एक फॅशन म्हणून पार पाडत आहे ? मुळात येथे प्रश्‍न असा आहे की, गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने पाण्याचे प्रदूषण होते का ? या गोष्टीची कायदेशीर आणि विज्ञानाच्या निकषांवर निश्‍चिती करून घेण्याचा खटाटोप किती हिंदूंनी केला? सहस्रो वर्षे चालणाऱ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे कधी पर्यावरणाची हानी झाली नाही; पण विज्ञानाने केवळ १०० वर्षांत पर्यावरण नष्ट करत आणले आहे. इतकेच नव्हे, तर जलप्रदूषण होऊ नये; म्हणून शासनाने निर्माण केलेली व्यवस्था अस्तित्वहीन झाली आहे. ती चांगल्या रितीने चालावी, यासाठी जे शासकीय अधिकारी नेमले गेले आहेत, त्यांना कदाचित त्यांच्या कर्तव्याविषयी माहितीही नाही. त्याची ही उदाहरणे पहा. (साभार:- सनातन प्रभात)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *