धारावी येथे दुर्गामाता दौड संपन्न

दि.१४ ऑक्टोबर (रविवार):- नवरात्रौत्सवानिमित्त धारावी विभागात आज सकाळी ७:०० वाजता दुर्गामाता दौड काढण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे ही देवीचे निस्सीम भक्त होते. मुखात नेहमी “जगदंब, जगदंब” असा जप आणि गळ्यात नेहमी तुळजाभवानीचा आशीर्वाद असलेली कवड्यांची माळ घातलेली असायची.
भारत माते की जय, भवानी माते की जय, अंबे माते की जय, दुर्गा माते की जय, हर हर महादेव अशा वेगवेगळ्या जयघोषात दौड चालू होती. या प्रसंगी हिंदू महासभा धारावी विभागातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक हिंदू समाजबांधव उपस्थित होते.
जय हिंदूराष्ट्र, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकर की जय.
रमेश बाबुराव कराळे
अखिल भारत हिंदू महासभा, मुंबई
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *