ठाणे, रायगड, पालघर जिल्हात सध्या गावोगावी जत्रांची धामधूम आहे. नुकतीच आमच्या जूचंद्र गावची आई चंडिकेची जत्रा संपन्न झाली. या वर्षी मात्र हिच जत्रा एका वेगळ्या नजरेतून बघण्याचा योग आला तो असा.!
आमच्या जत्रेच्या दोन दिवस आगोदर मंदिर परीसरात खेळणेवाले, खाऊ , पाळणेवाले यांच्या बरोबरच भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांची रेलचेल असते. ही लोक दोन दिवस आगोदर मंदिराच्या पायऱ्यांवर भीक्षा मागण्याची आपली जागा नक्की करून ठेवतात. पुर्वी तर हे दोन दिवस गावात घरोघरी जाऊन मागायची पध्दत होती. पण या लोकांना कुणी ग्रामस्थांनी खाली हात परत पाठविल्याचं उदाहरण सापडणार नाही. आजही या लोकांना कुणी मंदिराच्या पाय-यांवर भिक मागायला मज्जाव करतांना दिसणार नाही. उलट या गरीबांना दोन दिवस पंचपक्वान्न खायला मिळावं म्हणून गावातील एक कुटुंब मागची गेली अनेक वर्षे भांडाऱ्याचे आयोजन करतय. आमच्या पुर्वजांनी लावून दिलेली आणखी एक चांगली पध्दत म्हणजे आम्ही ग्रामस्त मातेच्या दर्शनाला जातांना प्रत्येक घरातून थैलीत तांदूळ व सुट्टे पैसे घेऊन जातो व दर्शनावरून परततांना त्या भिक्षेकरुंच्या झोळीत तांदूळ आणि सुट्टे पैसे टाकतो. ज्यामुळे या गरींबाच्या घरात कित्येक दिवस चूल पेटेल याची सोय होते. तीच गोष्ट फुगे-खेळणी विकणारे, पाळणी चालविणारे कामगार व ईतर छोटे छोटे धंदे करणारी लोक यात अगदी भटकंती करून जगणारी जमातही आहे या सर्वांच्या कुटूंबाची कित्तेक दिवसाची उदरनिर्वाहाची सोय साधली जाते.
गरीबाच्या घरचे दिवे पेटविणाऱ्या या सण उत्सवांचा एक हिंदू म्हणून अभिमान वाटतोच, पण एका ठराविक वर्गाकडे असलेला पैसा या सण उत्सवांमुळे अगदी तळागाळातल्या गरीब, गरजू कडे पोचविला जातो यातून जे अर्थकारण साधलं जातं या बद्दल पुर्वजांचं कौतूक वाटतं. आणि या निमित्त एक प्रश्न सारखा डोक्यात येतो की एरवी खोट्या पुरोगामीत्वापायी व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली हिंदू धर्म संपवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्यांकडे मात्र आमच्या सण उत्सवात “गरीबी निर्मुलनाचा” छोटासा का होईना पण जो उद्देश साधला जातो तसा या ढोंगींजवळ एकही कार्यक्रम कधी असतो का?उत्तर नाही हेच येतं.हिंदू धर्म नष्ट करण्याची स्वप्न बघणारे असे कितीतरी उपटसुंभ येऊन गेले. स्वतः नष्ट झाले, पण ही सनातन हिंदू संस्कृती अशीच टिकून आहे व टिकून राहील.
शैलेश केदारनाथ पाटील (फोटो- राज अरूण म्हात्रे यांच्या वॉल वरून साभार)
]]>