भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी – खेळ आकड्यांचा

मँचेस्टर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत ‘हॉट फेव्हरेट’ भारताला न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २४० धावांचा आव्हान पेलण्यास उतरलेल्या भारताला किवींच्या तेज-तर्रार गोलंदाजांनी २२१ वर बाद करीत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. ओल्ड ट्रॅफर्डच्या या मैदानावर झालेल्या या सामन्यात खूप काही घडामोडी घडल्या. पाहूया यातीलच काही आकडे.

  • मागील पाच वर्षात आयसीसी क्रिकेट स्पर्धांत सेमी फायनल व फायनल मधला भारताचा हा पाचवा पराभव आहे. २०१४ टी-२० विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धच्या पराभव, २०१५ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारावा लागलेला पराभव, २०१६ टी-२० विश्वचषकात मुंबईच्या वानखेडेवर वेस्ट इंडिजकडून मिळालेले पराभव, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून मिळालेला पराभव आजचा न्यूझीलंडविरुद्धचा पराभव. अश्या पाच पराभवांची चव भारताने मागील पाच वर्षांत चाखली आहे.
  • या स्पर्धेत भारताने खेळलेल्या खेळलेल्या आठ साखळी सामन्यांत पहिल्या पावरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या दहा ओव्हर्समध्ये केवळ चार गडी गमावले होते. पण आज. पहिल्या दहा ओव्हर्समध्ये चार गडी गमावले. आणि कदाचित हेच पराभवाचे मोठे कारण ठरले.
  • २४/४ हा भारताचा पहिल्या पवारपलेमधला स्कोर संपूर्ण स्पर्धेत निच्चांक ठरला. याचा सामन्यात न्यूझीलंडचा एक गडी बाद २७ हा यापूर्वीचा निच्चांक होता. थोडक्यात, एकाच सामन्यात दोन निच्चांक प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
  • महेंद्र सिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी सातव्या गड्यासाठी केलेली ११६ धावांची भागीदारी सर्वोत्तम ठरली. ऑस्ट्रेलियाच्या कुल्टर नायल व स्टीव्ह स्मिथ यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या १०२ धावांच्या भागीदारीचा विक्रम यावेळेस मोडीत काढला.
  • एकदिवसीय क्रिकेटमधला नंबर वन फलंदाज विराट कोहलीची आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील कामगिरी फारच सुमार आहे. त्याने खेळलेल्या ३ उपांत्य फेरीच्या सामन्यांत ४० चेंडूंत केवळ ११ धावाच केल्या आहेत. त्याही ३.६७ च्या सरासरीने व २७.५ च्या स्ट्राईक रेटने. शिवाय, या तिन्ही वेळेस त्याला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी बाद केले आहे. २०११ ला पाकिस्तानच्या वहाब रियाझने, २०१५ ला ऑस्ट्रेलियाच्या मायकल जॉन्सनने व आज न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने.
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *