खेळ खल्लास… भारत पराभूत, न्यूझीलंड फायनलमध्ये

विश्वचषक स्पर्धा २०१९: न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करीत दुसऱ्यांदा केला फायनलमध्ये प्रवेश

मँचेस्टर: जेव्हा शनिवारी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हा भारतीय चाहते जाम खुश झाले. कारण उपांत्य फेरीत त्यांची गाठ न्यूझीलंडशी होणार होती. नेट रनरेटच्या आधारावर न्यूझीलंड कसाबसा उपांत्य फेरीत पोचला होता. पण कोणी विचार केला होता की हा न्यूझीलंड संघ भारताची इतकी वाट लावेल? पोटापुरत्या धावा धावफलकावर लावल्यानंतर त्यांची गोलंदाजांनी जी अफलातून गोलंदाजी केली त्याला तर सलामच! रोहित, कोहली, राहुल, पंत, कार्तिक, पांड्या यांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवत मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर आलेल्या भारतीय समर्थकांना जणू रडवलेच. आपली आठवी सेमी फायनल खेळणाऱ्या न्यूझीलंडने भारताला लोळवत अगदी ऐटीत दुसऱ्यांदा आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मँचेस्टर: जेव्हा शनिवारी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हा भारतीय चाहते जाम खुश झाले. कारण उपांत्य फेरीत त्यांची गाठ न्यूझीलंडशी होणार होती. नेट रनरेटच्या आधारावर न्यूझीलंड कसाबसा उपांत्य फेरीत पोचला होता. पण कोणी विचार केला होता की हाच न्यूझीलंड संघ भारताची इतकी वाट लावेल? पोटापुरत्या धावा धावफलकावर लावल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी जी अफलातून गोलंदाजी केली त्याला तर सलामच! रोहित, कोहली, राहुल, पंत, कार्तिक, पांड्या यांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवत मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर आलेल्या भारतीय समर्थकांना जणू रडवलेच. आपली आठवी सेमी फायनल खेळणाऱ्या न्यूझीलंडने भारताला लोळवत अगदी ऐटीत दुसऱ्यांदा आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

वरूणराजाच्या मेहेरबानीने खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मध्ये झालेला बदल भारतीय फलंदाजांना चांगलाच भोवला. जगातल्या सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. चेंडूं स्विंग होऊन बॅटचे चुंबन घेत थेट उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे जात होता. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत पाहिलं तर भारतीय फलंदाजी म्हणावी तशी तपासली गेली नव्हती. आणि कदाचित यामुळेच उपांत्य फेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारतीय फलंदाजीची कसोटी पाहायला मिळाली.

कालच्या उर्वरित सामन्याला सुरुवात होताच भारतने न्यूझीलंडला पाच बाद २११ धावसंख्येवरुन २३९ धावांत रोखले. जडेजाने आपल्या डायरेक्ट हिटने टेलरला (७४) बाद करीत भारताच्या दिवसाची सुरेख अशी सुरुवात करून दिली. पुढच्याच चेंडूवर भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर जडेजाने टॉम लॅथमचा (१०) झेल घेत किवींचा सातवा गडी बाद केला. याच षटकात भुवीने हेन्रीला (१) बाद करीत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश घातला. किवींनी आपल्या निर्धारित ५० षटकांत आठ बाद २३९ धावा करीत एक समाधानकारक धावसंख्या उभारली.

आजही ढगाळ वातावरण असल्यानं परिस्थिती गोलंदाजीसाठी पूरक होती. शिवाय न्यूझीलंडने आपल्या संघात तीन भक्कम वेगवान गोलंदाज घेतल्यानं त्यांचं पारडं जड होतं. काल नाणेफेकीच्या वेळी जेव्हा भारतीय संघ जाहीर केला तेव्हा मोहम्मद शमीचं नाव नसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. न्यूझीलंडकडे असलेली वेगवान गोलंदाजीची तोफ गडाडली. रोहित शर्मा, विराट कोहली व केएल राहुल पहिले तीन फलंदाज प्रत्येकी एक-एक धाव काढून परतल्याने चौथ्या षटकातच भारताची अवस्था तीन बाद पाच अशी दयनीय झाली. त्यात आणखी भर पाडली ती दिनेश कार्तिकने. २१व्या चेंडूंत आपली पहिली धाव काढणारा कार्तिक पहिल्या पावरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर २५ चेंडूंत सहा धावा काढून बाद होत विश्वचषकातला पावरप्लेमधला २४ धावसंख्येचा निच्चांक केला.

चार गडी तंबूत परतल्यानंतर भारताचा नवा नंबर चार रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी काही काळ संघर्ष केला. पण अनुभवाची कमतरता असलेल्या या दोन फलंदाजांनी अगदी सहज विकेट टाकत भारताला मुश्किलमध्ये आणले. पंत-पांड्या यांनी प्रत्येकी ३२ धावा केल्या.

सामन्यात खरी रंगत आणली ती महेंद्र सिंग धोनी व रवींद्र जडेजा या चेन्नई सुपर किंगच्या जोडीने. संजय मांजरेकर यांनी ट्विटरवरून टीका केल्यानंतर आपल्या खेळातून उत्तर देणाऱ्या जडेजाने आज झकास खेळी केली. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलेच खेळून काढत आपले अर्धशतक लगावले. जडेजाने धोनीच्या साथीने सातव्या गड्यासाठी १०४ चेंडूंत ११६ धावांची भागीदारी करीत भारताला पुन्हा सामन्यात आणले. जडेजाने केवळ ५९ चेंडूंत चार चौकार व तितकेच षटकार खेचत ७७ धावा केल्या. जेव्हा संघाला या जोडीची खरी गरज होती तेव्हा जडेजा ट्रेंट बोल्टला मोठा फटका मारण्याच्या नादात विलियम्सनकडे झेल देत बाद झाला. धोनीने पुढच्याच षटकात फर्गुसनला बॅकवर्ड पॉइंटला षटकार खेचत सामना रोमांचक बनवला. पण एक चोरटी धाव घेण्याच्या नादात मार्टिन गप्टिलचा ‘डायरेक्ट हिट’ धोनीला महाग पडला. धोनी (५०) बाद होताच मैदानात स्मशानाची शांतता पडली आणि भारताच्या उरलेल्या अशाही धूसर झाल्या. सरते शेवटी न्यूझीलंडने भारताला २२१ धावांवर बाद करीत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड: २३८/८ (५०) – रॉस टेलर ७४ (९०), केव्ह विलियम्सन ६७ (९५), भुवनेश्वर कुमार १०-१-४३-३

भारत: २२१/१० (४९.३) – रवींद्र जडेजा ७७ (५९), महेंद्र सिंग धोनी ५० (७२), मॅट हेन्री १०-१-३७-३

न्यूझीलंड १८ धावांनी विजयी

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *