नाशिक जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरतीत घोटाळा

नाशिक:- जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सन २००८ कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) गट ‘क’ भरतीत घोटाळा झाला असून, गुणवत्ता धारक उमेदवारांना डावळण्यात आल्याची वृत्त माहितीच्या अधिकारातून समोर आले असून, संबंधित अधिकाऱ्यांची भांडाफोड झाली आहे. सदर भरतीत श्री. जोशी प्रकाश आसन क्र, १२८४००२१ याचे एकूण गुण ९२.५० आहेत. तरी देखील त्यांची निवड केली नाही. त्यांच्या पेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवार श्रीमती पवार पल्लवी रामकृष्ण, आसन क्रमांक १२८४०००८ यांची निवड केलेलीआहे. श्रीमती पवार यांना एकूण गुण ८२.५० मिळाले आहेत. निवड यादी व गुणांचा तक्ता बघितल्यावर भरतीत घोटाळा झाल्याचे दिसून आले. प्रशांत देशमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता, नाशिक. ( श्रीकृष्ण देशपांडे, सोलापुर )]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *