लेखा लिपिक परीक्षाः वेळापत्रक व ओळखपत्र कोषागार कार्यालयात उपलब्ध

अमळनेर, जळगाव, दि. 4:- संचालक, लेखा व कोषागार महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लेखा लिपीक परीक्षेचे आयोजन दि. ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत नाशिक येथे मुख्याध्यापक, शासकीय तांत्रिक व वाणिज्य विद्यालय केंद्र तथा औद्योगिक शाळा, जुना आग्रा रोड, त्र्यंबक नाका, आदिवासी विकास भवन जवळ, नाशिक (फोन नं. ०२५३-२५७२८८८) या परिक्षा केंद्रावर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी परीक्षेचे वेळापत्रक व ओळखपत्राचा नमुना जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच यासंदर्भात संचालनालयाचे परिपत्रक इंटरनेटवरुन डाऊनलोड करण्यासाठी www.mahakosh.in/Dat(Mahakosh.in)/employee corner मधील Exams या टॅबमध्ये किंवा Dat (Mahakosh.in) च्या Notice Board वर उपलब्ध आहे. परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्या त्या जिल्ह्यातील कोषागार कार्यालयांशी संपर्क साधावा व त्यांचेकडून परिक्षेचे वेळापत्रक व ओळखपत्राचा नमुना प्राप्त करुन घ्यावे. अधिकृत ओळखपत्रासह परिक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन बाळासाहेब घोरपडे, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे. सागर कुळकर्णी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *