चमत्काराने रुग्णांना बरे करण्याचा दावा करणारे खिस्ती फादर सॅबेस्टीन मार्टिन स्वत: रुग्णालयात ?

येशूच्या चमत्काराच्या नावे फसवणूक आणि धर्मांतरण करणारी सर्व केंद्र बंद करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती वसई – वसईच्या भुईगाव येथील ‘आशीर्वाद’ या केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशुला प्रार्थना करुन असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक करून धर्मांतरण करत आहेत हे आता सिध्द झाले आहे. नागरिकांमधील वाढता संताप पहाता हे केंद्र बंद करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला पोलिसांनी सुरुवात करताच यातून पळ काढण्यासाठीच ते इलाजाच्या नावाखाली ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले आहेत. इतरांना केवळ हात लावून प्रार्थनेने बरे करणारे फादर स्वतः रुग्णालयात उपचार करून घेत असल्याने त्यांची भोंदूगिरी उगड झाली असून, पोलिसांनी या त्यांच्या नाटकी डावपेचांना बळी न पडता त्वरीत त्यांना अटक करावी, तसेच अशा प्रकारे फसवणूक आणि धर्मांतर करणारया फादरना कायद्याचा बडगा दाखवावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. धर्मांतरणाच्या नावाखाली असाध्य आजार असलेल्या रुग्णांना येशुला प्रार्थना करा आणि बरे व्हा असे सांगून बरे केले जात असल्याचा दावा संचालक सॅबेस्टीन मार्टिन करत होते. त्यांच्या उपचार पद्धतीच्या चित्रफिती यू-टय़ूब आणि समाज माध्यमांमध्ये पसरल्याने खळबळ उडाली होती. हा सर्व प्रकार फसवणूक आणि धर्मांतरणासाठी आहे हे लक्षात आल्यावर विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी हे केंद्र बंद करून कारवाईची मागणी केली होती. वसई पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा तसचे मादक पदार्थ व आक्षेपार्ह जाहिरात कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अशा प्रकारची अनेक केंद्र आणि प्रार्थनेचे कार्यक्रम महाराष्टात सर्वत्र अजुनही सुरु आहेत. यामुळे आता शासनाने अशा प्रकारची सर्व केंद्र आणि खिस्ती फादर यांच्या कार्यक्रमांची सखोल चौकशी करुन फसवणूक करणारी सर्व केंद्र तात्काळ बंद करावीत तसेच संबंधित फादर यांच्यावर कठोर कायदेशीर करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. आपला विश्वासू, डॉ. उदय धुरी, मुंबई प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती संपर्क क्र. : ८४५०९५०५०२]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *