स्वातंञ्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात नरेंद्र जाधव यांचे २ फेब्रवारीला अर्थसंकल्प विश्लेषण

मुंबई ( महेशराव कुलकर्णी) केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानतंर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचे संपूर्ण विश्लेषण करण्याची स्वातंञ्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची परंपरा असून यंदासुद्धा गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०१७ या दिवशी सायंकाळी ७ वाजता खासदार व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे त्याचे विश्लेषण करतील. स्वातंञ्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अर्थसंकल्पाचे योग्य ते मूल्यमापन करून त्याचा प्रत्यक्ष जनतेवर होणारा परिणाम विशद करण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे. अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, अर्थतज्ञाकडून जाहीर विश्लेषण होण्याचा प्रसंग विरळाच. हा कार्यक्रम नि:शुल्क असून सर्व जागरूक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. स्वा.सावरकर यांनी १९३९ साली कोलकाता येथे भरलेल्या हिंदुमहासभेच्या अधिवेशनात राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी ‘वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय’ या धोरणावर आधारीत हिंदुस्थानच्या भावी अर्थनीतीचे सूत्ररूपाने विवेचन केले होते.मला आज त्याच सूत्रांवर आधारित “उपभोक्ता आणि उत्पादक” यांच्यात समन्वय साधणारे आर्थिक धोरण नरेंद्र मोदी अमलात आणीत आहेत. “आर्थिक स्वातंञ्य नसेल तर राजकीय स्वातंञ्याला काहीच किंमत नसते” हे स्वातंञ्यवीर सावरकरांचे सांगणे होते. त्यामुळेच जनतेत आर्थिक प्रश्नांविषयी जागृती करण्याच्या स्मारकाच्या धोरणाचा भाग म्हणून यापुढे प्रतिवर्षी अर्थसंकल्पावर निष्पक्ष अर्थतज्ञाचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी सांगितले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *