सनातन संस्थेला बळीचा बकरा बनवणे अजूनही चालूच ! मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी साध्वींच्या अटकेला ८ वर्षांनंतर त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत असे तपास यंत्रणांनी सांगितले; मडगाव बाँबस्फोट प्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना ४ वर्षांनी निर्दोष मुक्त केले; पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाडला अटक करून ८ महिने झाले, तरी अद्याप एकही पुरावा तपास यंत्रणांकडे नाही, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई चालू आहे; अशातच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. यातून पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्य करणार्या सनातन संस्थेला सॉफ्ट टार्गेट समजून बळीचा बकरा बनवणे भाजपच्या शासनकाळातही चालूच आहे. एकूणच केंद्रात आणि राज्यात सत्तापालट झाला; मात्र हिंदुत्ववाद्यांचा छळ काही थांबलेला नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. यामुळे देशातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आमच्याकडे सरकारच्या या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी सनातनच्या पुण्यातील १५ साधकांची चौकशी झाली, पैकी २ जणांच्या पॉलीग्राफीक टेस्टची मागणी सीबीआयने केली. ती मान्य करत सनातनने या प्रकरणी पूर्णतः सहकार्य केले. या टेस्टचे पुढे काय झाले, हे कुठेही कळले नाही. सप्टेंबर २०१५ मध्येच दाभोलकर हत्येप्रकरणी तपास करणारे सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांच्या विरोधात आम्ही पत्रकार परिषद घेऊन उच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेल्या अधिकार्याची या प्रकरणी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ते येथेही सनातनला गोवतील, असा आरोप केला होता. तो आज खरा ठरला. काल रात्री उशीरा डॉ. तावडे यांना अटक करून सनातनला गोवण्यासाठी सीबीआयने एक पाऊल पुढे टाकले. डॉ. तावडे निष्पाप असून ते सनातनच्या पनवेल येथील आश्रमात साधना करण्यासाठी येत असत. २००७ पूर्वी ते हिंदु जनजागृती समितीत कार्यरत होते. काही कौटुंबिक कारणांमुळे ते घरी राहून साधना करत होते. उद्या कलबुर्गी हत्येप्रकरणीही सनातनच्या आणखी काही निर्दोष साधकांना गोवून अटक करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल, यात शंका नाही. दाभोलकर हत्या प्रकरणातील पहिली अटक असा चुकीचा प्रसार ! डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल नामक दोन गुंडांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडून हत्येत वापरलेले पिस्तुल मिळवल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले होते. जर ते पिस्तुल पोलिसांकडे आहे, तर त्याच पिस्तुलाने पुढच्या दोन हत्या कशा काय होऊ शकतात ? यातील नागोरीने न्यायालयात राकेश मारीया यांच्यावर आरोप करतांना गुन्हा कबूल कर, २५ लाख देतो असा दबाव टाकल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपाचीही पुढे चौकशी झाली नाही, तसेच दोघेही जामिनावर मुक्तही झाले. गोव्यात राजकीय बस्तान बसवण्यासाठी आपकडून आरोपांचे सत्र ! आपने गोव्यातील पुढील वर्षी होणार्या निवडणुका लढवण्याचे घोषित केले असून, त्यामुळे गोव्यात प्रभाव असणार्या हिंदुत्ववादी संस्थेवर आरोप करून फुकट प्रसिद्धीसह अल्पसंख्य मतांची बेगमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी प्रथम बलात्कार, दंगली, लाच आदी प्रकरणांत गुंतलेल्या आपच्या नेत्यांच्या संदर्भात केजरीवालांना; तसेच काँग्रेसी घोटाळ्यांबद्दल सोनियांना अटक करण्याची मागणी करण्याचे धाडस दाखवावे ! श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था (07775858387)]]>