आव्हाड साहेब, आतंकवादी इशरत जहाँ तुमची "बहन"

मग राष्ट्रप्रेमी प्रज्ञा सिंग, कर्नंल पुरोहीत, धनंजय देसाई हे कोण आहेत ??? जितेन्द्र आव्हाड जरी जन्माने हिंदु असले, तरी कर्माने मुसलमान आणि कृतीने मात्र हरवलेला निडर हिंदु आहे असं मी मानतो. कारण इरशत जहाँ ही आंतकवादी आणि फिदाईन अटैकर असून सुद्धा जाहिरपणे तिला जितेंद्र आव्हाड “बेटी ” संबोधतो. त्यामागे राजकारण कोणतेही असो, पण त्याने ते बोलण्याची हिम्मत दाखवली. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून, राज्य करणारे पक्ष किंवा एकाही हिंदुत्ववादी नेत्याने निष्पाप हिंदु साध्वी प्रज्ञाजीना “बहन” म्हणून किंवा देशाच्या भविष्यासाठी स्वतःचा वर्तमान देण्याऱ्या युद्धभुमीत आंतकवाद्यांशी दोन हात करताना त्यांना मारून युद्धात जखमी झालेल्या आणि देशातील गलिच्छ राजकारणाने बळी घेतलेल्या भारतीय सेनेच्या कर्नल पुरोहीत ह्यांना कोणी “भाऊ” म्हणून, तसेच लहान वयातच देश, देव, धर्म रक्षणाची शपथ घेतलेल्या, सदैव धर्मरक्षणाकरीता अखंड सावधान असणाऱ्या युवा हिंदुहदयसम्राट श्री.धनंजय भाई देसाई ह्याना कोणी आपला “मुलगा” म्हणून संबोधलं नाही, ह्याचे खुप दुख वाटते. ह्यापेक्षा हिंदुंचे दुर्दैव ते काय असेल! आव्हाडजी, मुसलमानांच्या सानिध्यात राहून तुम्ही एक गोष्ट मात्र नक्की शिकलात, जी हिंदु नेत्यांना आणि हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षांना शिकायला हवं होतं. वन्देमातरम्… हिंदुसैनिक संदिप विठोबा भिंगुडे]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *