तब्बल १४ वर्षांनी महाराष्ट्राचा 'देविंदर वाल्मिकी' करणार ऑलिम्पिक हॉकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व

२०११ साली महाराष्ट्र सरकारने घर देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न करता एका प्रकारे या महाराष्ट्राच्या उमद्या खेळाडूला केराची टोपली दाखवली आहे. फडणवीस सरकारने शपथविधीच्या वेळी पुन्हा एकदा आश्वासन दिलं. आज भाजपचं सरकार येऊन २० महिने उलटले, परंतू ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि ना क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी याची दखल घेतली. अशी परिस्थिती असतांनाही त्यावर मात करीत मुंबईकर देविंदर वाल्मिकी याने आज आपली जिद्ध राखत थेट रिओ ऑलिम्पिकपर्यंत झेप घेतली. पाहू या आमचे प्रतिनिधी भास्कर गाणेकर यांनी घेतलेली देविंदर वाल्मिकी याची खास मुलाखत. देविंदर प्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. काय म्हणशील तुझ्या या प्रवासाबद्दल. देविंदर: खूप खूप बरं वाटतंय मला. एक भारतीय खेळाडू म्हणून खूप अभिमान वाटतोय. एवढ्या दिवसांच्या मेहनतीचंच हे फळ बोलता येईल. शालेय वेळापासून जेंव्हा मी हॉकी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून माझं स्वप्न होतं की, मी भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधीत्व करावं. आज ते माझं स्वप्नं पूर्ण झालं असं म्हणता येईल. आणि मला आशा आहे की, या वेळेस भारत नक्कीच पदक जिंकेल. १९८० च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारताने या स्पर्धेत पदक जिंकलं नाही. काय म्हणशील आताच्या संघाविषयी देविंदर: भारतीय संघाची कामगिरी पाहता मला विश्वास आहे की, भारत पदक नक्कीच जिंकेल. संघ आता योग्य स्थितीत आहे असं म्हणता येईल. चुरस नक्कीच असेल, पण योग्य रितीने सामने खेळले तर भारत नक्कीच यश प्राप्त करेल. संघातील डावपेच व पूर्व तयारी अगदी योग्य रितीने आम्ही बेंगलोर येथे आमच्या शिबिरात करीत आहोत. संघाची तयारी पाहता मला संघाच्या चमकदार कामगिरीवर खूपच विश्वास आहे. [caption id="attachment_1856" align="aligncenter" width="600"]devinder-walmiki-with-dhanraj-pillay देविंदर वाल्मिकी धनराज पिल्लेंसोबत[/caption] तुला या खेळाची लहानापासून आवड कशी निर्माण झाली? देविंदर: तसं पाहिलं तर खूप मोठी कथा आहे ही. वयाच्या ९ व्या वर्षांपासून मी हॉकी खेळायला सुरुवात केली. माझा मोठा भाऊ युवराज याची या खेळाची रुची आणि त्याची जिद्द पाहून मलाही या खेळाची आवड निर्माण झाली. मी अगदी शालेय जीवनापासून त्याचा खेळ पाहायचो. शाळेतून आलो कि मी त्याला हॉकी विषयी प्रश्न विचारायचो. माझी आवड पाहून तो मला मैदानात घेऊन जायचा. मी त्याला विचारात असे की, हॉकी खेळणं खूप कठीण आहे का. तेव्हा तो मला सांगायचं की, तू खेळून बघ तुला नक्कीच समजेल आणि आवडेलही. तुझ्या कारकिर्दीतील  युवराजचं महत्व काय सांगशील. देविंदर: जसं मी सांगितलं,  हॉकीमध्ये मी जो आज आहे तो माझ्या भावामुळे. एक मोठा भाऊ म्हणून त्याने जे सगळं केलं जे एक भाऊ करतो. माझ्या किट पासून ते माझे कपडे,  बूट सगळं त्यानेच माझ्यासाठी दिलं. या खेळात तो फक्त माझा मोठा भाऊ नसून एक गुरु, माझा आदर्श आहे असं म्हणेन. मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. या स्पर्धेतही त्याला अंतिम संघात स्थान मिळवता आलं नाही. आता माझी जबाबदारी आहे की, माझ्या भावासाठी आणि आपल्या देशासाठी पदक जिंकून द्यायचं. घरच्यांचा हातभार कसा लाभला तुझ्या या प्रवासात. देविंदर: कोणत्याही खेळाडूला कुटुंबाचा आधार खूप महत्वाचा असतो. माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासूनच खूप मदत केली. आम्ही अत्यंत गरीब घरातून आलो आहोत. माझ्या वडिलांचं मासिक उत्पन्न अगदी खूप कमी होतं. तरीही त्यांनी आम्हां भावंडांना कुठंलीही कमतरता भासू दिली नाही. मला तेव्हा विचारलं की, तुला नक्की विश्वास आहे का, की तू हॉकीमध्ये तुझं करियर करशील. मी तेव्हा त्यांना सांगितलं की मला नक्की विश्वास आहे की, मी या खेळात यशस्वी होईन. यशस्वी व्हायला वेळ लागेल, पण मी नक्कीच यशस्वी होईन. माझ्या या विश्वासाला माझ्या घरच्यांनी योग्य साथ दिली आणि त्याचेच फळ जे मी आज इथपर्यंत पोहोचलो.  माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तु पैसे काम करूनही कमावशील पण देशाचं आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रतिनिधत्व करशील तो क्षण माझ्यासाठी खूप गौरवाचा आणि अभिमानाचा असेल. आणि जेव्हा सामना सुरु होण्याआधी भारतीय राष्ट्रगीत चालू होतं तेव्हा एका सीमेवरच्या जवानांची जशी देशसेवा करताना भावना असते तशी भावना माझी असते. तेव्हा खेळाडू हे विचार नाही करत की, तो मुंबईचा आहे की क्रिकेटमध्ये जास्त पैसा आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही कधीच मनात आणत नाही. खूप बरं वाटतं देशाचं आणि माझ्या कुटुंबाचं नावं उंचावायला. रिओ ऑलिम्पिकच्या स्पर्धेच्या विषयी काय म्हणशील आणि तगडी स्पर्धा कोणाची असेल देविंदर: आमचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मागच्या काही स्पर्धा पहिल्या तर भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. मागील महिन्यांत झालेल्या चाम्पियन चषक स्पर्धेत भारताने रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. संघाची तयारी म्हटली तर, आम्ही आमच्या मागच्या स्पर्धांच्या वीडीओ पाहतो आणि त्यातून आम्हाला बरंच काही शिकायला भेटतं. तर तगडा प्रतिस्पर्धी पहिला तर सगळेच संघ आपापल्या परीने तगडे आहेत. मोठा प्रतिस्पर्धी पहिला तर ऑस्ट्रेलिया संघाची तगडी स्पर्धा भारताला मिळू शकते. परंतु भारताची कामगिरी आणि तयारी पाहता भारत नक्कीच सुवर्ण पदक मिळवेल. २०११ साली महाराष्ट्र सरकारने घर देण्याचं आश्वासन दिलं होत ते अजून पूर्ण केलं नाही. काय बोलशील या विषयावर. देविंदर: या विषयावर थोडंसंच बोलेन. भाजप सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. युवराजला २०११ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी घर देण्याचं आश्वासन दिलं होत. आता सरकार बदललय. दोन वर्षापूर्वी शपथविधी सोहळ्यावेळी मा. मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. जवळपास दोन वर्ष झाली अजून आम्हाला घर दिलं नाही. जर क्रिडामंत्री विनोद तावडे साहेब व मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या सारख्या राष्ट्रीय खेळाडूंकडे लक्ष दिला तर खूप बरं होईल. तब्बल १२ वर्षांनी मुंबईचा खेळाडू भारतीय हॉकी संघाचं ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं नेतृत्व करेल. कदाचीत ही गोष्ट त्यांना माहितही नसेल. आणि याच गोष्टीचं वाईट वाटतं. समजू शकतो की, एका मोठ्या पदावर आपण आहात आणि आपणास बरीचशी कामे असतात. पण आमच्याकडे पण जर लक्ष दिलं तर खूप बरं होईल आणि आम्हाला खेळण्याची अजूनही उत्स्फुर्तता मिळेल. आम्हाला आशा आहे की, मंत्री महोदय आम्हाला दिलेल्या या आश्वासनाचा योग्य तो विचार करतील. शेवटचा प्रश्न. १२५ कोटी लोकांना खूप अपेक्षा आहेत या वर्षी संघाकडून. काय म्हणशील देविंदर: संघाची तयारी आणि फॉर्म पाहता एवढंच सांगेन की, भारत नक्कीच पदक जिंकेल. माझं कुटुंबही खूप खुश आहे आणि त्यांनी मला हे ही म्हटलं की, जेव्हा तू भारतासाठी पदक जिंकशील तो क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा असेल. देविंदर तुझ्या या प्रवासाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला अपेक्षा आहे की, भारत या वर्षी सुवर्ण पदक नक्कीच जिंकेल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *