६ जानेवारी – पञकार दिनानिमित्त विशेष लेख आणि सर्वांना शुभेच्छा

**************************** *यशाचा नवा मंञ* !!शिवतंञची क्राईम लेखमाला!! पञकार दत्ता सोनवणे देशमुख लिखित (मो – 9623551025) * अखंड सावधान * -भाग सहावा- व्यथा पञकारांची… ***************************** तो कार्यक्रमात येतो, टिपण काढतो, बातमी देतो. त्याचा सत्कार होतो. त्याला मानसन्मान मिळतो. त्याला खास आरक्षित जागेवर जागा मिळते. तो कोणत्याही अधिकारी, पुढारी, व्यक्तीला भेटू शकतो. तो आपल्याला जाहिराती मागतो. आपण देतो. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी त्याचीच आठवण येते. काही समस्या असतील तर आपण त्यालाच सांगतो. एखाद्या पुढारी आणि पोलिसापेक्षाही जलद तो कामे करतो. असा तो पञकार… ह्या पञकाराकडे पाहिले की आपल्याला वाटते हा किती सुखी आहे. त्याला मानसन्मान आहे. किती पैसे कमवतो. किती ओळख आहे. किती माहिती आहे. हा किती भाग्यवान आहे. अशी आपली भावना तयार होते. पण कधी जाणून घेतलीय या पञकाराची व्यथा… काही लोक टिका करताना पञकार पैसे खातात… सेटलमेंट करतात… पैसे कमवतात… असे आरोपही करतात… या सर्वांनी हा शिवतंञचा लेख जरूर वाचा… मी पुण्यातील नामवंत अशा रानडे इन्टिट्युट मधे पञकारिता पदविका पुर्ण केली. स्थानिक चँनल, लोकमत, केसरी सारख्या ठिकाणी कामे केली. मी पिंपरी चिंचवड कार्पोरेशन, सांस्कृतिक विभाग आणि क्राईम या बिटवर काम केले. यामुळे पञकारांच्या व्यथा मला जवळून पाहता आणि अनुभवता आल्या… तो एक हाडाचा पञकार होता. २५ वर्षे पञकारिता केली. तो यशस्वी पञकार होता. तो आजारी पडला. दवाखान्यात नेले. गंभीर आजार निघाला. मोठ्या, नामवंत दवाखान्यात जायला बँक बँलन्स नाही. सरकारी दवाखान्यात दाखल झाला. आजपर्यंत दुसऱ्यासाठी धावणारा स्वतः आजारी पडला. त्याच्यासाठी कोण धावणार? जो पर्यंत तुम्ही पळता तो पर्यत जग पाठीशी असते. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा सारे सोडून जातात. पैशाअभावी, कमी सेवा सुविधां अभावी या पञकाराचे निधन झाले. त्याच्या मैतीला लाखो लोक… त्याच्या दहाव्याला लाखो लोक… श्रद्धांजली द्यायला व्हिआयपी लोक… पण त्याला दवाखान्यात भेटायला माञ काही निवडक लोक आले होते… आता या पेक्षा मोठी शोकांतिका ती काय ? लोक फक्त कामापुरते राम म्हणतात काम झाले की राम- राम करतात. हि जगाची रित आहे. आपल्याला पञकारांच्या बाबतीत जसे दिसते तसे नसते. हे लक्षात ठेवा. काही नामवंत पञकार सोडले तर बहुसंख्य पञकारांना नाममाञ पगार मिळतो. ज्या पगारात तो घराचे भाडेही देऊ शकत नाही. मग संसार चालवणार कसा? मुलांना शिक्षण देणार कसा? प्राथमिक गरजा पुर्ण करण्यासाठी सुद्धा त्याला ओढातान करावी लागते… अशा वेळी अर्थार्जनासाठी त्याला जाहिराती मिळवाव्या लागतात. काही हजारांच्या जाहिराती मिळाल्या तरी हा पैसा पञकाराला मिळत नाही यातील फक्त काही टक्केच त्याला मिळतात… बाकी सर्व फायदा चालकांना होतो. आता अनेक पैसेवाले भांडवलदार मिडीया क्षेत्रात उतरले आहेत. त्यांचा मुख्य उद्देश पैसे कमवणे आणि दोन नंबरचा काळा पैसा सफेद बनवणे हाच आहे. यातुन वर्तमानपत्र, चँनल निर्माण होत आहे. सामान्य पञकार अशा भांडवलदारांपाशी काम करतो. यामुळे दोघांचे धेय्य वेगळे असते. यातुनच पञकारांचे शोषण होते. एखाद्या पञकाराने जीवावर खेळून एखादा भ्रष्टाचार बाहेर काढला. काही गुप्त माहिती मिळवली तरी ती छापण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. अनेकदा वरूनच सेटलमेंट होते, प्रकरण दाबले जाते. लोक पञकारांना नावे ठेवतात पण यांच्याशी त्यांचा संबंधही नसतो. राग आला. विरोध करावा पण जाणार कुठे? हा नोकरीचा प्रश्न असतो. शिवाय अनेकदा काही चुकीच्या गोष्टी बाहेर काढल्या तर पञकार डोळ्यावर येतात. यातुन अनेकांवर जीवघेणे हल्ले होतात. घरादाराची रांगोळी होते. अशा वेळी कोणी साथ देत नाहीत. आणि कायद्याचा म्हणावा तेवढा आधारही नाही. पञकाराला सदैव जागृत रहावे लागते. राञी अपराञी काहीही झाले तरी जावे लागते. यामुळे वेळेवर झोप नसते, जेवनाच्या वेळा नसतात, आरोग्याकडे लक्ष नसते, यातुन शारीरिक आजार उद्भवतात. पण या कडेही लक्ष दिले जात नाही पर्यायाने गंभीर परिणाम भोगावे लागतात. आवश्यक वैद्यकीय सुविधा पञकारांना मिळतच नाहीत. अपुऱ्या पगारामुळे आणि घरी वेळ देता येत नाही यामुळे अनेक घरगुती समस्यांनाही तोंड द्यावे लागते. पञकारितेत काही चुकीच्या गोष्टी घुसल्या आहेत याला कारण पञकार नाही तर भांडवलदार आहेत. पञकार पेशा म्हणून, सामाजिक कार्य म्हणून काम करतात. पण भांडवलशाहीने धंदा बनवला आहे. यात चुका पञकारांच्या माथी मारून फायदा माञ दुसरेच घेत आहेत… पञकार हा तुमच्या आमच्या सारखा माणुसच आहे. या पञकारांमुळेच अन्यायाविरोधात वाचा फुटते, अनेकांना न्याय मिळतो, समस्या सुटतात, मिडीया लोकशाहीचा चवथा स्तंभ आहे. याचा पाया पञकार आहे. हाताची पाच बोटे सारखी नसतात. तसे समाजात सर्वच क्षेत्रात काही चुकीची मंडळी आहेत. पञकारांमधेही चार दोन टक्के चुकीचे आहेत. पण यामुळे बहुसंख्य प्रामाणिक पञकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा अन्याय आहे. आपण अशा प्रामाणिक पञकारांच्या समस्या, दुःख, अडचणी समजून घेतल्या पाहिजेत… पोलिसांच्या आणि पञकारांच्या समस्या सारख्याच आहेत… फरक फक्त एवढाच आहे की, पोलिसांच्या पाठीशी सरकारी पाठबळ आहे. पण सर्वांच्या पाठीशी असणाऱ्या पञकारांच्या पाठीशी माञ कुणीही नाही…. जय हिंद जय भारत…. (पत्रकार दत्ता सोनावणे)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *