संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधिच्या पुण्यदिनी ३ गायींना मिळाले कत्तलि पासून जीवदान

पुणे:- काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास समस्त हिंदु आघाडीचे गोरक्षण प्रमुख शिवशंकर स्वामी यांना माहिती मिळाली. ताडिवाला रोड, इनाम मशिदीच्या पाठीमागे पाण्याच्या टाकी खाली ३ गायी कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवल्या आहेत. अशी माहिती आल्यानंतर स्वामी यांनी पोलिस रक्षकासह तडिवाला रोड येथे जाऊन ते ठिकाण शोधून काढले आणि त्या ठिकाणी गायी बांधून ठेवल्या असल्याची खात्री करुन घेतली. मशीदीच्या शेजारी विनापरवाना बीफ चे दुकान चालु असल्याचे समजले. त्याठिकाणी गोवंशाचे मटन विकले जात होते असे आढळून आले. त्या नंतर श्री. स्वामी यांनी पोलिस नियंत्रण कक्ष (१००) क्रमांकाशी संपर्क साधला. तरी सुद्धा कारवाईच्या बाबतीत दिरंगाई होत होती. त्या वेळी सह पोलिस आयुक्त श्री. रामानंद साहेब आणि पशुसंवर्धन आयुक्त श्री. विश्वास भोसले यांना स्वामी यांनी सर्व माहिती दिली व कारवाई होत नसल्याची माहिती दिली. त्यामुळे बंडगार्डन पो.स्टे. चे वरिष्ठ पो.निरीक्षक श्री. मदन बहादरपुरे यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी केली असता मिरासाहेब अब्दुल हामिद खान याने सदरची जनावरे कत्तलकरण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संवरक्षण क़ायदा चे कलम ५ (अ) , (ब), ८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन, सर्व गायींना श्री.शिवसमर्थ गोशाळा वाघोली येथे पाठविण्यात आले. आपले नम्र मिलिंद भाऊ एकबोटे समस्त हिन्दू आघाडी…. (अनिकेत मावळे, ‘युवासह्याद्री’ पुणे)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *