मुंबई:- नुकताच ६ डिसेंबर रोजी मुंबई येथे अखिल भारत हिंदुमहासभा पक्षाच्या वतीने कोंकण विभागीय युवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. अखिल भारत हिंदुमहासभा अंतर्गत “हिंदु युवा सभा” कोंकण प्रांत युवा प्रभारी श्री. अरुण माळी यांनी सदर मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांना “हिंदु युवा सभा” मुंबई जिल्हा प्रभारी श्री. उमेशजी केळुसकर, रायगड जिल्हा कोषाध्यक्ष श्री. मधुकर खामकर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अभिजीत दरेकर यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. अखिल भारत हिंदुमहासभा अंतर्गत “हिंदु युवा सभा” मेळाव्यामध्ये पक्ष संघटन वाढीबाबत विविध विषयांवर सभागृहामध्येच पक्षाच्या प्रमुख वरिष्ठांनी युवा कार्यकर्त्यांबरोबर चर्चासत्राच्या माध्यमातून थेट संवाद साधून युवकांचे विचार जाणून घेतले. अशा प्रकारे खुल्या चर्चेद्वारे आपले मत मांडण्याची संधी युवकांना उपलब्ध करुन दिल्यामुळे युवकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्यच जणू निर्माण झाल्याचे दिसत होते. अनेक युवकांनी पक्ष संघटन वाढीच्या दृष्टिने विविध सुचना वरिष्ठांसमोर मांडल्या. यामध्ये महेश जोशी, प्रविण लोखंडे, ज्ञानेश्वर उतेकर, प्रसाद करकरे, प्रशांत सुतार, सत्यम कोंडे, गणेश कदम, मधुकर खामकर, हरीष शेलार, अमोल देसाई, इत्यादिंनी सहभाग घेतला. खेळी-मेळीच्या वातावरणात, दुपारच्या भोजन समारंभानंतर “अखिल भारत हिंदुमहासभा पक्षाच्या वरिष्ठांनी युवकांना अमुल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी हिंदुमहासभा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री. दिनेशजी भोगले, पक्षाचे वरिष्ठ नेते श्री. विलासराव खानविलकरजी, हिंदु युवा सभा प्रदेश प्रभारी श्री. राकेशजी हिंदुस्थानी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री. स्वप्निलजी जागूष्टे, मुंबई अध्यक्ष श्री. हरीषजी शेलार यांचे अमुल्य असे मार्गदर्शन लाभले. हिंदु युवा सभा कोंकण प्रांत आयोजित सदर मेळाव्याचे नियोजन करण्यास हिंदुमहासभाचे कार्यवाह श्री. पांडूरंग पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. [gallery columns="4" link="file" ids="902,901,900,899,898,897,896,895,894,893,892,891"] अखिल भारत हिंदुमहासभा आयोजित युवा मेळाव्याची सुरुवात स्वातंञ्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, श्री. स्वप्निलजी जागूष्टे यांच्या सुमधूर वाणीने “ध्वजवंदन” गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक श्री. अरुणजी माळी यांनी केले, तसेच कार्यक्रमाची सांगता “वंदेमातरम्” गीताने करण्यात आली.]]>