मुंबई– 29/मार्च/2015 रोजी सकाळी 11 वाजता हिंदुमहासभा भवन, परळ-मुंबई. येथे महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभा च्या वतीने युवा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते हिंदुमहासभा प्रदेश युवा अध्यक्ष पदी शिवराज चंदापुरे, हिंदुमहासभा प्रदेश युवा कार्यवाह पदी अधिवक्ता जयेश तिखे, हिंदुमहासभा प्रदेश युवा संघटक पदी स्वप्निल जागुष्टे, हिंदुमहासभा प्रदेश युवा कार्यकारीणी सदस्य म्हणुन अनुक्रमे श्री. हरिष निकम, कु. शैलेश काळोखे, श्री. अरुण माळी यांची निवड करण्यात आली. त्यावेळी स्वप्निल खैरे, प्रशांत केणी, उमेश केळुसकर, मारुती वजरे, पांडुरंग पवार इत्यादी उपस्थित होते. प्रथम सुरुवातीला हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश युवा प्रभारी श्री. राकेश हिंदुस्थानी म्हणाले की सद्याची राजकीय परीस्थिती पाहता “अखंड हिंदुराष्ट्र निर्माण” करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गांव-नगर-तालुका-जिल्हा यातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटन केले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती-संस्था-संघटना यांच्या राष्ट्रधर्म सेवेत हिंदु म्हणुन सहभागी झाले पाहिजे. हिंदुराष्ट्राचा पाचवा वेद विज्ञान अर्थात व्हाॅटसअप, फेसबुक या सामाजिक माध्यमावरच हिंदुचे संघटन न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणार्या युवांचे कृतीशील संघटन केले पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभा प्रवक्ता श्री दिनेश भोगले म्हणाले की हिंदुमहासभा पक्ष हा संख्यात्मक बलवान नसला तरी गुणात्मक आहे. प्रसिद्धीझोतात नसला तरी पक्ष अस्तित्वहीन नसुन जिवंत आहे. हिंदुत्वाशी कधीही आम्ही तडझोड केली नाही आणि करणारही नाही. जात-प्रांत-भाषा असा आमच्या पक्षात भेद नाही केवळ हिंदु-हिंदी-हिंदुस्थान या सुत्रांवरच आपण अविरत कार्य करावे. एमआयएम, मुस्लिम लीग सारख्या देशद्रोही पक्षास थोपविण्यासाठी सर्वोत्तम विकल्प एकच तो म्हणजे एबीएचएम(अभाहिंम), हिंदुचा पक्ष हिंदुमहासभा बळकट करण्यासाठी हिंदुनी आतातरी जागृत होऊन हिंदुमहासभेचा स्वीकार करावा तरच “हिंदुचे अच्छे दिन” येतील. महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभा अध्यक्ष श्री. अणुप केणी म्हणाले ज्याप्रमाणे धर्माच्या आधारावर हिंदुस्थानाचे विभाजन झाले तो भुभाग परत मिळविण्यासाठी अखंड हिंदुस्थान लढा सुरुच ठेवावा. “भारत छोडो” चे रुपांतर “भारत तोडा” असे झाले हे ऐतिहासिक सत्य आहे पण हिंदुस्थानच्या नकाशात पंजाब, पश्चिम बंगाल आणि भाग्यनगर(हैदराबाद) दिसत आहे तो हिंदुसभेमुळेच. एमआयएम ला जर उत्तर द्यायचे असेल तर हिंदु युवांनी हिंदुहितरक्षणार्थ हिंदुमहासभेचे सदस्य व्हावे. ‘हिंदुत्व’ च्या सुत्रांवर निवडणुकीच्या मैदानात उतरावे असे उपस्थित युवांना मार्गदर्शन केले.]]>