तक्रार प्रविष्ट करणाऱ्या पुजाऱ्याला पोलिसांकडून अनाहूत सल्ले ! धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणावर शासन वचक बसवणार का ? भांडुप, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील पश्चिमेकडील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी आणि सनातनचे हितचिंतक श्री. विजय ठोंबरे (गुरुजी) यांना धर्मांधाने बांबूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते गेल्या १६ वर्षांपासून मंदिरात पूजा करत आहेत. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या धर्मांधावर कारवाई होण्यासाठी पुजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. (पोलिसांनी धर्मांधांवर तत्परतेने कठोर कारवाई करावी. श्रीकृष्ण मंदिर असलेल्या परिसरात धर्मांधांची वस्ती आहे. श्री. ठोंबरेगुरुजी यांना हे धर्मांध नेहमी त्रास द्यायचे. १६ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता ते मंदिर बंद करत असतांना काही धर्मांध तेथील पुजल्या जाणाऱ्या वडाच्या पारावर बसून मद्य पित होते. तसेच झाडावर फटाकेही उडवत होते. त्या वेळी श्री. ठोंबरेगुरुजींनी सांगितले, “पूजेचे स्थान असलेल्या श्रद्धास्थानाजवळ असे कुकृत्य करू नका. येथे आमचे दैवत आहे. दुसऱ्या ठिकाणी फटाके फोडा.” त्या वेळी मद्यपी धर्मांध फैजल म्हणाला, “मला इथेच फटाके फोडायचे आहेत. मी अन्य कुठेही फटाके फोडणार नाही.” असे म्हणून धर्मांधाने श्री. ठोंबरेगुरुजींना बांबूने मारहाण करण्यास प्रारंभ केला. (अशाने हिंदू त्यांच्या धर्मश्रद्धांचे पाविञ्य कसे राखू शकतील ? राज्यशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे ! ) या प्रकरणी १७ नोव्हेंबर या दिवशी श्रीकृष्ण मंदिर न्यासाच्या वतीने श्री. ठोंबरेगुरुजी तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेले. त्या वेळी पोलीस म्हणाले, “तुम्ही केवळ तक्रार (एन्सी) करा. कोणते कलम लावायचे, ते अधिवक्ता पहातील. तुम्ही हा प्रकार घडल्यावर लगेच तक्रार प्रविष्ट करायला हवी होती. १०० क्रमांकावर तरी संपर्क करायचा.” (असा सल्ला पोलिसांनी धर्मांधांना दिला असता का आणि धर्मांधांनी त्यांचे ऐकले असते का ? ) (साभार:- सनातन प्रभात)]]>