पुणे, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – अखंड भारत करून सिंधु नदी वहाणे, ही हुतात्मा पंडित नथुराम गोडसे यांची इच्छा होती. ही इच्छा एका व्यक्तीची नसून ती समस्त हिंदूंची आहे. नथुराम गोडसे यांचा अवमान करणे, हे समस्त हिंदूंचा अवमान करण्यासारखे आहे, ही गोष्ट विरोधकांनी लक्षात घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. ‘हुतात्मा पंडित नथुराम गोडसे इच्छा पत्र न्यासा’च्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हुतात्मा पंडित नथुराम गोडसे यांची ६६ वी पुण्यतिथी त्यांच्या अस्थिकलश पूजनाद्वारे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ६६ निरांजने प्रज्वलित करून अस्थिकलशाचे औक्षण करण्यात आले. या वेळी दिवंगत गोपाळ गोडसे यांचे सुपुत्र श्री. नाना गोडसे, त्यांचे पुत्र श्री. अजिंक्य गोडसे आणि गोडसे कुटुंबीय उपस्थित होते, तसेच हिंदुत्ववादी सर्वश्री विद्याधर नारगोलकर, भाग्यनगर येथील डॉ. सीतारामय्या, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील अनेक राष्ट्र्रप्रेमी नागरिक उपस्थित होते. या वेळी अभिनव भारतच्या दिवंगत हिमानीताई सावरकर यांना ‘शांतीमंत्र’ म्हणून श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी ‘खंडित भारत अखंडित करण्यासाठीचा संकल्प’ उपस्थितांकडून संस्कृत भाषेत म्हणवून घेण्यात आला. नथुराम गोडसे यांच्या इच्छापत्राचे वाचन सौ. अंजली गोडसे यांनी केल. या कार्यक्रमात गोडसे यांनी न्यायालयामध्ये केलेले वक्तव्य कु. दिविजा गोडसे हिने इंग्रजी भाषेत सादर केले. त्याचा मराठी आणि हिंदी भाषेतील अनुवादही या वेळी सादर करण्यात आला. गोडसे हे नाव संसदीय करण्याचा प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक ! – श्री. अजिंक्य गोडसे न्यासाच्या कार्याची माहिती देतांना श्री. अजिंक्य गोडसे यांनी सांगितले की, मी नथुराम गोडसे डॉट कॉम या संकेतस्थळावर पंडित नथुराम गोडसे यांचे विचार, इच्छापत्र, त्यांनी आई-वडिलांना लिहिलेले पत्र ठेवण्यात आले आहे. या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी नथुराम गोडसे या नावाने सामाजिक संकेतस्थळ फेसबूक यावर खातेही उघडण्यात आले आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या सर्वाद्वारे भारतीय संसदेने गोडसे हे नाव असंसदीय म्हणून जाहीर केले आहे, ते खोडून काढण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. अविनाश काशीकर यांनी, तर सूत्रसंचालन कु. आभा गोडसे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वन्दे मातरम् म्हणून करण्यात आली. क्षणचित्रे १. या कार्यक्रमामध्ये ‘नथुराम – अ मार्टीअर सेंट’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन झाले. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांचे जीवन कर्म, ज्ञान आणि भक्ती या योगांशी निगडीत कसे होते, याविषयी लेखन करण्यात आले आहे. २. ‘युक्रांद’च्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करून विरोध करण्याचा प्रयत्न पुण्यतिथीचा कार्यक्रम चालू असतांना कार्यक्रमस्थळाच्या बाहेरच्या बाजूला युवक क्रांती दलच्या (युक्रांदच्या) १५ युवक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महात्मा गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. उपस्थित पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना हुसकावून लावले. आंदोलन करणार्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, आमचा आक्षेप हा हुतात्मा या शब्दाला आहे. जी व्यक्ती खुनी आहे, ती हुतात्मा कशी होऊ शकतो ? आम्ही हे आंदोलन वैयक्तिकरित्या करत असून त्याचा संघटनेशी काहीही संबंध नाही. (कार्यकर्त्यांची वैचारिक दिवाळखोरी ! – संपादक) साभार : सनातन प्रभात]]>