जेसन रॉयच्या वादळापुढे ऑसीज निस्तानाभूत, इंग्लंड तिसऱ्यांदा फायनलमध्ये

विश्वचषक स्पर्धा २०१९: इंग्लंड-न्यूझीलंड रंगणार विश्वचषक फायनल, मिळणार नवा जगजेत्ता

बर्मिंघम: लॉर्ड्सवर झालेल्या पराभवाचा वचपा काढत यजमान इंग्लंडने तगड्या ऑस्ट्रेलियाला निस्तानाभूत करीत आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात  आठ गडी व १०७ चेंडूं राखत दणदणीत विजय मिळवीत तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. येथील एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २२३ धावांवर बाद करीत मिळालेलं टार्गेट ३२.१ षटकांतच पूर्ण केले. ख्रिस वोक्सचा तुफानी मारा व जेसन रॉयची वादळी खेळी इंग्लंडच्या विजयात महत्वाची ठरली.

या विश्वचषक स्पर्धेत नाणेफेकीचा कौल खूपच महत्वपूर्ण ठरला आहे. नाणेफेकीचा मूल्य आणखी कोणाला विचारायचं असेल तर विराट कोहलीला नक्कीच विचारा. पहिल्या सेमी फायनलमध्ये नाणेफेक किती महत्वपूर्ण ठरली हे कोहली आयुष्यभर विसरणार नाही. आज ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकत कोणताही विचार न करता प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण आज इंग्लंडचा दिवस होता. ख्रिस वोक्स व जोफ्रा आर्चर यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या आघाडीने नांगी टाकली. फिंच (०), डेव्हिड वॉर्नर (९), हॅंड्सकोम्ब (४) हे फलंदाज फलकावर १४ धावा असतानाच तंबूत परतले. आपल्या चिकाटी जिद्दीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियासाठी स्टीवन स्मिथ (८५) व अलेक्स कॅरी (४६) यांनी चौथ्या गड्यासाठी १०३ धावांची भागीदारी रचित डाव सावरला. पुढे ग्लेन मॅक्सवेल (२२) व मिचले स्टार्क (२९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया कसाबसा २२३ धावांपर्यंत पोचला.

दुसऱ्या डावात ढगाळ वातावरण असल्यामुळे गोलंदाजांना मदत मिळणार होती. पण इंग्लंडची सलामी जोडीने वेगळाच निश्चय करून मैदानात उतरली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या पावरप्लेमध्ये ५० धावा ठोकल्यानंतर ११ ते २० या षटकांत तब्बल ९७ धावा ठोकत सामना आपल्या बाजूने फिरवला. जेसन रॉय व जॉनी बेएरेस्टो या खतरनाक जोडीने स्पर्धेतील चौथी शतकीय भागीदारी लगावत पहिल्या २० षटकांतच इंग्लंडचा विजय निश्चित केला. बेएरेस्टोने ४३ चेंडूंत ३४ तर रॉयने ६५ चेंडूंत नऊ चौकार व पाच षटकार ठोकत ८५ धावा केल्या. दोघे सलामीवीर माघारी परतल्यानंतर जो रूट (नाबाद ४९) व कर्णधार इयॉन मॉर्गन (नाबाद ४५) यांनी उरलेली कामगिरी फत्ते करीत इंग्लंडला विजयश्री आणले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया: २२३/१० (४९) – स्टीवन स्मिथ ८५ (११९), अलेक्स कॅरी ४६ (७०), ख्रिस वोक्स ८-०-२०-३

इंग्लंड: २२६/२ (३२.१) – जेसन रॉय ८५ (६५), जो रूट ४९ (४६), पॅट कमिन्स ७-०-३४-१

इंग्लंड आठ गडी व १०७ चेंडू राखून विजयी

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *