तसेच युवकांना समाज कार्यासाठी आगरी सेनेच्या माध्यमातून बळ देण्यासाठी व युवकांना संघटित करून समाज हित साधले जावे यासाठी संघटनेच्या माध्यमातून जबाबदारीे स्वीकार करून कार्यरत होणे गरजेचे आहे. युवा वर्गाने एकत्र येऊन, समाजाचे नेतृत्व करण्यासाठी, आगरी समाजातील शेवटच्या घटकांचा विकास साधण्यासाठी, प्रत्येकाने वेगळ्या जबाबदारीची म्हणजेच आगरी सेनेच्या पदाची जबाबदारी घेणे महत्वाचे आहे. आगरी सेना नेहमीच युवकांच्या गुणवत्तेला प्राधान्य देते. त्यांच्या कार्याचा गौरव करते. युवकांना एकत्र आणण्याचे आगरी सेना एक चांगले माध्यम असून, तुमची आर्थिक परिस्थिती न पाहता, तुमचे राजकीय पक्ष न पाहता, फक्त तुमची गुणवत्ता, समाजाप्रति असलेली धडपड, कार्य करण्याची क्षमता पाहून आगरी सेनेत जबाबदारी दिली जाते.
म्हणूनच आगरी समाजातील बांधवाना, युवकांना, एक संधी निर्माण केली गेली आहे. त्या संधीचा जास्तीत जास्त आगरी बांधवानी, युवकांनी लाभ घ्यावा. अर्थात विविध प्रकारच्या पदाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारावी. जो कोणी आगरी सेनेत पदाधिकारी म्हणून समाजकार्य करण्यास इच्छुक असेल त्याने आपले नाव स्वतःहून खालील नंबर वर कॉल,अथवा मेसेज करून कळवावे असे आवाहन आगरी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क – ९२२१२३७७१५, ९०२९४४७८३०, ८०८०८५१३३३
]]>