पर्यावरण मित्र संघटनेचे पहिले पर्यावरण चर्चा सत्र पुणे यां ठिकाणी संपन्न

आळंदी, पुणे: संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र राज्यासह भारतातील इतर राज्यात व्रुक्षा रोपण, पर्यावरण संरक्षण, व त्यासाठी जनजागृती चे प्रामाणिक , निस्वार्थ कार्य करणाऱ्या पर्यावरण मित्र संघटना, भारत संस्थेचे पहिले पर्यावरण चर्चा सत्र गोखले मळा ,आळंदी, पुणे यां निसर्गरम्य परिसरात अत्यंत उत्साहाने संपन्न झाले. सदर पर्यावरण चर्चा सत्राची सुरुवात दिपप्रज्वलन व संतश्रेष्ठ जगतगुरू ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पर्यावरण मित्र संघटना, भारत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक मा.श्री.देवा तांबे सर यांनी स्वीकारले.प्रास्ताविक संस्थेचे राष्ट्रीय सचिव मा.श्री.जनार्दन सोनवणे सर यांनी केले.तसेच सूत्रसंचालन हवेली तालुका अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत कांबळे सर व पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.विजय चोघळा सर यांनी केले.
चर्चा सत्रास उपस्थित पदाधिकारी यांना पर्यावरण संरक्षण यां विषयांवर मोलाचे मार्गदर्शन संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भांडारकर मॅडम , राष्ट्रीय सचिव मा.जनार्दन सोनवणे सर,महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ.कांचन लांघी मॅडम यांनी केले.तसेच उपस्थित पदाधिकारी यांनी आपले संस्थे विषयी व पर्यावरण विषयी मत स्पष्ट करून निस्वार्थ, प्रामाणिक पर्यावरण कार्य करू असे वचन दिले.त्या नंतर पदाधिकारी यांना संस्थेचे अधिकृत ID कार्ड,श्रीफळ व रोप भेट देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मा.सौ.वैष्णवीताई पाटील यांनी केली.
सदर पर्यावरण चर्चा सत्रास संस्थेचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे सर , राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.वर्षा ताई भांडारकर मॅडम, राष्ट्रीय सचिव श्री.जनार्दन सोनवणे सर ,महाराष्ट्र राज्य महिला सल्लागार सौ.स्नेहा तांबे मॅडम, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ.कांचन लांघी मॅडम, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.वैष्णवी ताई पाटील मॅडम, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.वंदना पोतदार मॅडम, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री.विजय चोघळा सर , पालघर जिल्हा सचिव श्री.सुनिल घरत सर , हवेली तालुका अध्यक्ष श्री.चंद्रकांत कांबळे सर , खेड तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर सोनावणे सर , खेड तालुका सचिव श्री.रूपेश अगरवाल सर, खेड तालुका उपाध्यक्ष श्री.गणेश ब्रम्हे, खेड तालुका युवा अध्यक्ष कु.रामेश्वर बाविस्कर सर ,खेड तालुका महिला अध्यक्षा सौ.सुप्रिया सत्यजित गायधनी मॅडम,वसई तालुका उपाध्यक्ष श्री.लक्ष्मीप्रसाद पाटील सर , वसई तालुका सचिव श्री.सुचित पाटील सर , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.रोशन पाटील सर , ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष श्री.विजय साळुंखे सर ,भिवंडी तालुका अध्यक्ष श्री.शशिकांत पाटील सर , भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्री.किशोर पाटील सर , अकोला जिल्हा अध्यक्ष कु.रवि करे सर ,अकोला जिल्हा उपाध्यक्ष जगजीवनराम कातखेडे सर , बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री.राजकुमार व्यास सर , बुलढाणा जिल्हा युवती अध्यक्षा कु.आयुशी दुबे मॅडम, पुणे सदस्य श्री.आनंद पोतदार सर ,श्री.विनायक पाटील सर , ठाणे सदस्य श्री.प्रदिप म्हात्रे सर ,श्री.प्रेम गिराशे सर , श्री.विकास शेलार सर , श्री.अजय साळुंके सर , श्री.लवेश माळसे सर तसेच पुणे जिल्हा विभागातील इतर पर्यावरण प्रेमी सदस्य उपस्थित होते.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *